________________
प्रस्तावना
वगैरे जैनसूत्रांत त्यांची माहिती मिळतें पण त्यांत निर्दिष्ट केलेलीं मतें अमक्याचीच याचा मात्र स्पष्ट उल्लेख नाही.
पुरण्यकश्यप हा बुद्धापेक्षाहि वयोवृद्ध होता. पार्श्वनाथ व महाबलि यांच्या मध्यंतरकाली ह्याला व त्याच्या मताला बरीच लोकप्रियता प्राप्त झाली होती. हा नम राहात होता असे बौद्ध ग्रंथावरून समजते. आपण पूर्णज्ञानी असल्याचे तो प्रतिपादन करी. हा अक्रियावादी होता. त्याच्या मताप्रमाणे आत्मा हा निष्क्रिय आहे व जेव्हां जेव्हा आपण कांहीं कार्य करतो किंवा करवितो तेव्हां तेव्हा आत्म्यावर जबाबदारी अशी काहींच राहत नाही. असे असल्यामुळे आपण सत्कर्म केले काय किंवा पाप केले काय तें सर्व सारखेच. या विचाराची सादृशाबाबत तुलना वैदिकमतामधील भारद्वाज व नासिकेत यांच्या मताशी करण्यात येते. पण सांगाचे टीकाकार शीलांक यांना या पुरणकाश्यपाच्या मताची तुलना सांख्याबरोबर केली आहे व ती जास्त योग्यहि दिसते. पुरण्यकाश्यप यांची दृष्टिविकृत व विपर्यस्त आहे आणि थोडीबहुत सांख्याबरोबर जुळते. याचे कारण दोन्ही मने आयेंतर संस्कृति प्रवादातीलच आहेत. दर्शनसारनामक दिंगबर जैन ग्रंथावरून असे दिसते की, पूरणकाश्यप हा अज्ञेयवादी होता.
कुकुद कात्यायन हा पिंपळाद ब्राह्मण कुपीचा एक समकालीन होता असे प्रश्नोपनिषदावरून समजते. हा थंड पाण्याचा उपयोग न करतां ऊन पाण्याचाच उपयोग करत असे. असत् पासून कांही उत्पन्न होत नाहीं व सत् कधींच नाश पावत नाही असे त्याचे मत होते. चार महाभूतें, मुख, दु:ख व आत्मा अशी सात तत्वे जो मानीत असे त्याच्या मताप्रमाणे ती सातही तत्वें भिन्न व स्वतंतच आहेत. थंड पाण्यान जीव आहे म्हणणं जैनमुनी लोकाच्या आचरणाश तंतोतंत जुळते, कारण जैनमुनी नेहमी गरम पाण्याचाच उपयोग करतात. यावरून कात्यायन यानी पार्श्वनाथमादाय मुनच अनुकरण केलं असल्यास त्यांत कांही नवल नाहीं.
अजितशाली हा वैदिक क्रियाकाण्डाचा कट्टर विरोधी होता. शरीर व जीव हे दोन्ही एकच असे तो समजत असे. म्हणजे शरीराचा नाश झाल्याबरोबर त्याच्याबरोबर जीवाचाहि नाश होतो असे तो प्रतिपादन करीत असे. यावरून असे अनुमान काढण्यास आधार आहे की, त्याने अहिंसातत्वास खास तिलांजली दिली होती. त्याने संपूर्णपणे जडवादाचाच प्रचार केला होता. निर
(
१७ )