________________
प्रस्तावना
उपनिषदामध्ये पुनर्जन्मतत्वाची रूपरेषा आखलेली दिसून येते. उदाहरणार्थ. ब्रह्मस्वरूपात निमम झालेला मनुष्य मरणानंतर देवांच्या मार्गाने जातो, ब्रह्मस्वरूपांतच लीन पावतो व पुन: या मृत्युलोकांत परत येत नाही. जो मनुष्य सत्कृत्य करतो आणि ज्याला ज्ञानाची प्राप्ति झालेली आहे तो मात्र चंद्रलोकांत जाऊन फळे भोगतो व नंतर वनस्पतिरूपाने किंवा मनुष्यरूपाने जन्म घेतो. पण दुष्ट लोक मात्र चाण्डाळ कुत्री वगैरे योनीत जन्म घेतात. कौषीतकी उपनिषद्मध्ये वर्णन केलेला मार्ग याहून थोडासा भिन्न आहे. पण यावरून एवढे सिद्ध होतें की, ब्राह्मणकाली दृष्टोत्सतीस येत नसलेली पुनर्जन्माची कल्पना उपनिषदकाली वैदिकसंस्कृतिप्रवाहांत रूढ झाली होती.
उपनिषद्काली पुनर्जन्मासारखी वैदिकवाध्ययांत भाकस्मात् उद्भूत होऊन नवीनच रूढ झालेली दुसरी एक कल्पना म्हणजे कर्मासंबंधी होय. बृहदारण्यक उपनिषदामध्ये एके ठिकाणी असे म्हटले आहे की, पूर्वकृत कर्मानुसारच मरणोत्तर गति ठरविली जाते. ऋग्वेदकालापासून उपनिषदकालापर्यंत वैदिक लोकांच्या वार्मिक कल्पनेची रूपरेमा येथपर्यंत आपण पाहिली. प्रत्येक चौकसवुद्धीच्या मनुध्याला असे दिसून येईल की वेदब्राह्मण व उपनिषद् या दोन धार्मिक कल्पनाप्रवाहामध्ये बराच मोठा खंड दृष्टीस पडतो. पुनर्जन्म व कर्म या तत्त्वांची कल्पना उपनिषदकाली नवीनच दिसते. ही जी दोन विशिष्ट तत्त्वे उपनिषद्काली रूढ झाली त्यांना बाहेरून खचितच काही तरी प्रेरणा मिळाली असली पाहिजे आणि. ही प्रेरणा कोणाकडून मिळाली याचाहि उपपत्ति लागावयास पाहिजे.
ज्यावेळी आर्थ लोक हिंदुस्तानांत आले त्यावेळी हिंदुस्तानदेश हा एक ओसाड व निर्जन प्रदेश असावा अशी कल्पनाहि करवत नाही. त्या प्राचीन काळांत संबंध हिंदुस्तानांत आजच्याइतकी जनवस्ति नसली तरी गंगेसारख्या नदीकाठी सुपीक प्रदेशांत लोक खास राहत असतील यांत संशय नाही. त्यावेळी गंगानदीकाठी जे लोक राहत होते त्यांची संस्कृति कशा प्रकारची होती हे सागावयास आजतरी काही पुरावा नाही. त्याच सुमारास दक्षिणेत राहणाऱ्या मूळच्या रहिवाशांची संस्कृति श्रेष्ठ दर्जाची होती, याच्यावरूनच दक्षिणदेशापेक्षा मुगीक अशा गंगानदीकाठची संस्कृति श्रेष्ठच असेल अशी कल्पना करावयास काहीच हरकत दिसत नाही. पण निश्चित पराव्याअभावी अशाप्रकारच्या संस्कृतीच्या अस्तित्वाविषयी विद्वान् लोक साशंक आहेत. परंतु वैदिकवाड्मयच बारकाईने
(७):