________________
सर्व प्राणी मात्रांना लागते; याकरितां आपल्या आत्म्यासारखे दुसऱ्या आत्म्यांना देखील अनिष्ट अशा हिंसेचे आचरण केव्हाही न केले पाहिजे.
याच गोष्टीस स्वयं श्रमण · भगवान् श्रीमहावीर स्वामीनी देखील अशा प्रकारे सांगितले आहे:
"सने पाणापियाउया, सुहसाया, दुहपडिकूला, अप्पियवहा, पियजीविणो, जीविउकामा । (तमा) णातिवाएज्ज किंचणं"
अर्थ:-सर्व प्राण्यांना आयुष्य प्रिय आहे, सर्व सखाचे अभिलाषी आहेत, दुःख सर्वांना प्रतिकूल आहे, वध सर्वांना अप्रिय आहे, जीवनक्रिया सर्वांना प्रिय लागते-सब जीवांना जिवंत राहण्याची इच्छा आहे, याकरिता कोण माहि जीवाला न मारिले पाहिजे किंवा कट न दिले पाहिजे. अहिंसेच्या आचरणाविषयी आवश्यकतेकरितां यापेक्षा जास्त आणखी काहीच पुरावा नाही आणि पुरावाही होऊ शकत नाही परंतु येथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की अशा प्रकारच्या अहिंसेचे पालन सर्वच मनुष्य कसे करूं शकतील ? कांकी ज्याप्रमाणे शास्त्रांत सांगितले आहे:
जले 'जीवाः स्थले जीवा, जीवाः पर्वतमस्तके ॥ ज्वालामालाकुले जीवाः, सर्व जीवमयं जगत् ॥ १ ॥
अर्थ:-पाण्यांत, भूमीत, पर्वतात, अग्नीत वगैरे सर्व ठिकाणी जीव भरलेले आहेत; सगळे जग जीवमय आहे; याकरितां मनुष्याच्या प्रत्येक व्यवहारात ह्मणजे खाण्यांत, पिण्यांत, चारण्यांत बसण्यांत, व्यापारांत, विहारांत वगैरे सर्व प्रकारच्या व्यवहारांत जीवहिंसा होते.
१ या श्लोकांत जीवा: या शब्दाच्या ठिकाणी विष्णुः असे देखील ह्मणतात.