________________
प्रस्तावना
हस्तगत झाल्यानंतर दिवसेंदिवस सोमसगाचा प्रसार होऊ लागला; माणि होत, अवयु, उद्गातृ, इत्यादि पुरोहितांचे प्रस्थहि समाजांत वाढले.
वर ऋग्वेदातील धार्मिक कल्पनांची जी रूपरेषा मांडली तिच्यांत क्रियाकोडाशिवाय दुसरें विशेष असे काहीच नाही. सर्व ऋग्वेद एकाच वेळेला रचला गेला नाही हे एकदा वर सांगितलेच आहे. त्याचे काही भाग फारच जुने भाहेत तर काही भाग फार अलिकचे आहेत. दहाव्या मंडळाची गणना प्राचीन भागांत होत नाही. ह्या मंडलांत तत्वज्ञानाच्या काही कल्पना प्रादुर्भत झाल्याच्या आढळतात. देवांच्या अनेकत्वाविषयी शंका प्रदर्शित करण्यांत येऊ लागली आणि विश्वचें आदितत्व एकच या दिशेने विचारप्रवाह वाहूं लागला. प्रथम जलाच्या स्वरूपांत व नंतर उष्णनेच्या स्वरूपांत याप्रमाणे असत् पासून सत्ची उत्क्रान्ती झाली असा जगदुत्पत्तीचा क्रम आहे असे दाखविण्याकरितां बरेंच प्रयत्न झालेले आहेत. मृत्यूनंतरच्या प्राण्यांच्या अवस्थेविषयीं ऋग्वेदांत काहीच विशेष असें सांपडत नाही. मृतात्म्यांच्या मरणोत्तर स्थितीविषयीही एकमत दिसून येत नाही. यम हा प्रथम मरण पावलेला व मृत लोकांचा राजा म्हणून समजला गेला होता असे दिसते. मेल्यानंतर लोक यमाबरोबर आनंदाने बोलत असतात अशीहि एक कल्पना दृष्टीस पडते. दुसऱ्या एका ठिकाणी असे सांगिसले आहे की देव व पितर हे निरनिराळ्या ठिकाणी राहतात. तिसरी ही एक कल्पना अशी आहे की, आत्मा हा जलाशी व वनस्पतीशी एकरूप होतो. यावरून ऋग्वेदकाली पुनर्जन्माविषयी कल्पना रूढ होती असे तत्कालीन पुराव्यावरून तरी सिद्ध होत नाही. दुष्ट लोकांची मरणोत्तर स्थिती काय होते याचीहि उपपत्ति योग्य रीतीने लावलेला दिसत नाही. परंतु हा संग्दिधपणा ऋग्वेदाच्या नीतिधर्माविषयी दिसून येणा-या तौलानिक औदासिन्याचे चिन्ह आहे. राजा वरूण हा सर्व द्रष्टा आहे किंवा सर्व शक्तिमान् आहे एवढ्याचवरून नैतिक चांगुलपणा किंवा ३.हाणपणा हे त्याचे वैशिष्टयदर्शक आहे असे होत नाही. पुढे माझगकाली यज्ञयागादि क्रियाकाड जास्त जास्तच वाढत गेले व त्याबरोबर पुरोहितांची संख्याहि वाढत गेली. याच्या पुढील काळांत धान्यादिकाच्या बलींचे महत्त्व पूर्वीइतके राहिले नाही. पशुबलीचे प्रस्थ जास्त वाढले व त्याबरोबरच सोमयागाचीही महती वाढली. वर्षभर चालणारे यागसत्र सुरू होऊन पुरोहितांचे महत्त्व वाढू लागले व राजे लोकहि आपल्या सार्वभौमत्वाचे स्थापक