________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
तील दुःख निवारण व्हावे म्हणून म. बुद्धानें अष्टांग मार्ग सांगितला. महावीराची दृष्टी निराळी आहे. त्याची दृष्टी भावी गतीकडे अधिक होती. ती सुधारण्यासाठी या जन्मी ते वाटेल तितके कष्ट सहन करण्यास तयार होते व होण्यास सांगत. सुख-दुःखाचे कारण शोधू जातां, ते आपण केलेल्या कर्मातच सापडतें म्हणून पूर्वजन्मी आपण काय केलें व काय होतो आणि पुढील जन्मी काय होऊ याचा विचार करावा लागतो. पूर्वजन्मीं जशी कर्मे आपण केली तशी बरीवाईट फळे आपणांस या जन्मी मिळत आहेत. घल्याळांतील लंबक जसा इकडून तिकडे हालत असतो तसा हा जीव जन्म व मरण यामध्ये येरझारा घालीत असतो. घड्याळाला चावी नसेल तर लंबक हालत नाही. त्याचप्रमाणे कर्माची चावी दिलेली नसेल तर जीवाला जन्म-मरणाचे फेरे फिरावे लागणार नाहीत हा फेरा सुखकारक नाही. क्वचित सुख होते; पण ते क्षणभंगुर असते. शिवाय या क्षणभंगुर मुखामुळे त्या फे-यांना अधिक गतिहि मिळते. म्हणून परिणामतः हे क्षणभंगुर सुखहि दुःखकारकच आहे. काहीहि करून या दुःखांतून सुटले पाहिजे व त्यासाठी कर्माच्या किल्लीचे फेरे कमी केले पाहिजेत. म्हणून हे फेरे कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याकडेच आर्याची अधिक प्रवृत्ति आहे. कर्माची दिलेली किल्ली कशी तरी सोडविण्याचा ते प्रयत्न करतात. महावीरस्वामी या प्रयत्नाचेच आदर्श होत. त्यांनी कर्मक्षयासाठी खडतर तपश्चरण केलें : " जर्मनीतील एका पंडिताने महावीर व बुद्ध या नांवाचेच पुस्तक लिहिले आहे व त्यांतहि त्याने वरील मत प्रगट केले आहे. म. बुद्धाचा मार्ग विस्ताप्रमाणे इहलोकांतील प्रवृत्तिसाधक आहे व भगवान महावीराचा मार्ग निवृत्तिपर अतएव काही तरी पारलौकिक ध्येयासिद्धीसाठी आहे असे जे म्हटले जाते ते खरे आहे. म. बुद्धाला ऐहिक खरे मुख मिळवावयाचे होते व म. स्त्रिस्ताला भांडखोर लोकांना गुण्यागोविंदाने नांदावयास शिकवावयाचे होते. म्हणून अष्टांगमार्ग व सामान्य नीति आणि ' Sermon on the mount ' सांगून या जगांत सुख-दुःख भोगण्यास यावेच लागू नये असा मार्ग त्यांना सांगावयाचा होता. बुद्धादिकांना विषारी वृक्षाला निर्विष करावयाचे होते. भगवान महावीरांना त्याचे मूळच्छेदन करावयाचे होते. या ध्येयभिन्नतेमुळे दोघांचे मार्गहि भिन्न झाले.
भगवान् महावीरांचा काल इ. स. पू. ६१७ ते इ. स. पू. ५४५ आणि म बुद्धाचा काल इ. स. पू. ६२३ ते इ. स. पू. ५४३ आहे. त्यावरून भगवान
(१०१)