________________
महावीरचरित्र
याच जन्मांत जो सुख भोगतो तो अत. अष्टांगमार्ग ज्याने पूर्णपणे आचरिला त्याला आर्यज्ञान प्राप्त होऊन निर्वाणप्राप्ति होते असें बुद्धाने म्हटले आहे. एकंदरीत भगवान् महावीरांचा आत्मप्रातीचा मार्ग व म० बुद्धाचा मुखप्राप्तीचा मार्ग या दोहोंमध्ये महदंतर आहे. बौद्धांच्या धर्मग्रंथाची रचना पाली भाषेत आजपासून सुमारे बावीसशे वर्षापूर्वीच झाली. या ग्रंथांचे तीन विभाग आहेत. विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. पहिल्या पिटकांत भिक्षंच्या आचारनियमांचे वर्णन आहे. दुसऱ्यांत म० बुद्धाचे उपदेश व तिसऱ्यांत बौद्ध तत्वज्ञान आहे.
डॉ. विमलचरण लॉ. एम्. ए. बी. एल्. एफ्. आर. एस्. हे जैन व बौद्ध अशा दोन्ही धर्माच्या वाङ्मयांत पारंगत आहेत. त्यांनी दोन्ही वाङमयांत आढळणाऱ्या कांहीं पारिभाषिक शब्दांची चांगली तुलना केली आहे. कर्म हा शब्द बौद्ध-वाङ्मयांतहि सांपडतो; पण जैनशास्त्रांत त्याचे जितकें सूक्ष्म विवरण आहे तितकें बौद्धग्रंथातून नाही. कर्म पुगलाणु आहेत अशी शास्त्रीय मीमांसा जैनाशिवाय इतर कोणत्याहि तत्त्वज्ञानाने केलेली नाही. बौद्धशास्त्रांत जीव व अजीव या शब्दांचे जिवंत व निर्जीव असे सामान्य अर्थ घेतले आहेत; पण जैनतत्त्वज्ञानांत आत्मतत्व व जडतत्व या अर्थी ते वापरलेले आहेत. कामुळे या दोन तत्वांचा संयोग झाल्यावर जी वस्तु बनते तिला जिवंत म्हणता येईल; पण जैनशास्त्रांतील हा सूक्ष्म भेद लक्षात न घेतांच बौद्धशास्त्रकारांनी ते शब्द वापरलेले आहेत. आस्रव या शब्दाचे बाबतीतहि बौद्धांनी असाच घोटाळा केला आहे. कर्म म्हणजे वैषयिक मुख, भाव म्हणजे जन्म, दित्थि म्हणजे खोटा विश्वास व अविना म्हणजे अविद्या या चारीमुळे जी पातकें होतात त्याला बौद्ध ग्रंथांतून आलव म्हटलेले आहे. अर्थात् बौद्धशास्त्राप्रमाणे आस्रव म्हणजे पापच होय. पण जैन शास्त्राप्रमाणे पुण्य स्त्रवसुद्धा आहे. शुभाशुभ कर्मा द्वार म्हणजे आस्रव. कायावाचामनेंकरून जी बरी वाईट कमें घडतात ती सर्वच आस्रव. संवर शब्दाचा अर्थ बौद्ध शास्त्रकारांनी संयम म्हणूनच केला आहे. पण जैनशास्त्राप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ तोच असला तरी सूक्ष्म म्हणजे 'आलवनिरोधलक्षणः संवरः ' असा आहे. उलट बंध या शब्दाचा अर्थ बौद्धांनी संयोजन किंवा संयम म्हणून केला आहे तो अगदीच विचित्र आहे. जैनश्रावक हा गृहस्थहि असू शकतो; पण बौद्धश्रावक हा भिक्षच असला पाहिजे.
(९८)