________________
अन्मति-तीर्थ (४) सूरं मण्णइ अप्पाणं-एक अनोखी गाथा
- सुमतिलाल भंडारी 'नामदेव म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी', हा अभंग ऐकला व मला तशाच एका श्रेष्ठ ग्रंथाची - सूत्रकृतांगाची आठवण झाली. त्यातली एक तरी गाथा स्वतः अनुभवावी असे प्रकर्षाने वाटू लागले. विचार करता करता, 'सूर मण्णइ अप्पाणं, जाव जेयं न पस्सति ।' ही गाथा डोळ्यासमोर आली. मी ती गुणगुणू लागलो, अन् थोड्याच वेळात एका वेगळ्याच भावविश्वात पोहोचलो. विचार करता करता, मला त्या गाथेत, अर्थांची अनेक वलये दिसू लागली. संतवचनातील तेजाचा साक्षात्कार होऊ लागला व माझी समाधी लागली.
त्या अवस्थेत मी पाहिले की, मी भगवान महावीरांच्या धर्मसभेत जाऊन बसलो आहे. तेथे अनेक नवदीक्षित साधू बसले आहेत. प्रवचन चालू आहे. विषय अर्थातच 'सूरं मण्णइ अप्पाणं' हाच होता. महावीर सांगत होते की, 'जोपर्यंत अडचणी येत नाहीत, तोपर्यंत भित्री माणसे स्वत:ला शूर समजतात. सर्व जग आपल्या मुठीत आहे, या संभ्रमात वावरतात. इतरांना तुच्छ लेखतात. पण तसे नसते. माणसाची खरी कसोटी लागते ती अडचणी समोर उभ्या ठाकल्यावरच. हे श्रमणांनो, तुम्ही दीक्षा घेतलीत, साधु-जीवनाला आरंभ केलात, आता तुम्हाला अनेक परीषह, अनेक उपसर्ग सहन करावे लागतील. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. त्याची तयारी ठेवा. स्वत:ला आताच आत्मसंयमी मानून गाफील राहू
अन्मति-तीर्थ इतरांना काय सांगतात ते. मी मग महावीरांच्या दुसऱ्या धर्मसभेत पोहोचलो. तेथे शास्त्रे पठण केलेली विद्वान, पंडित मंडळी उपस्थित होती. प्रवचनाचा विषय 'सूर मण्णइ अप्पाणं' हाच होता. महावीर सांगत होते, हे विद्वान जनहो, ही गाथा लक्षपूर्वक ऐका. तुम्ही शास्त्राचे जाणकार आहात. तुम्ही सर्वांनी भरपूर अध्ययन केले आहे. पण तुम्ही केलेल्या या अध्ययनाने हुरळून जाऊ नका. इतरांना तुच्छ लेखू नका. कारण तुम्ही केलेले अध्ययन म्हणजे समुद्रातील एक थेंब आहे. तुम्हाला अजून बरेच अध्ययन करायचे आहे. अनेक शंकांचे निरसन करून घ्यायचे आहे. हे लक्षात असू द्या.'
महावीरांच्या तिसऱ्या धर्मसभेत, लोहार, कुंभार, शिंपी, श्रीमंत श्रेष्ठी इ. सामान्य लोकांना महावीर सांगत होते की, 'हे सज्जनांनो, तुमचे सगळे आयुष्य सुखाचे व समाधानाचे चालले आहे. काही लोक तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. हे तुमच्या पूर्वसंचिताचे फळ आहे. यात तुमचा पुरुषार्थ तो कसला ? तेव्हा बढाया मारू नका. दुसऱ्याला कमी लेखू नका आणि कसोटीचे क्षण आले तर त्याला तोंड द्या.'
ही प्रवचने ऐकली व एक वेगळीच शंका मनात आली. वास्तविक पाहता, स्वतःला शूर समजणे हे आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तसेच तो पुरुषार्थाचा पायाही आहे. असे असताना, भित्री माणसेच फक्त स्वतःला शूर समजतात, हे कसे? आणि सर्वांनी काय सदैव स्वत:ला कमीच लेखत रहावे ? महावीर असे कसे सांगू शकतात ? मला ज्ञानेश्वरीतील एक ओवी आठवली,
राजहंसाचे चालणे । भूतळी जालिया शाहाणें । आणिकं काय कोणें । चालोवेंचिना ।। १८-१७१४
नका.'
मला माहीत होते की महावीर, समोरचे श्रोते पाहून, त्यांच्या त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार प्रवचन देतात. त्यांच्या भाषेत बोलतात, मनात विचार आला, पाहू या,