________________
SIN
अर्थात निश्चित काळापर्यंतच्या अनशनानंतर पुन्हा अन्न ग्रहण करण्याची इच्छा होते. मरणकालपर्यंत अन्नाची इच्छाच करायची नाही. याला निरवकांक्ष म्हणतात. ३५९.
सर्व तपात अनशन तपाला प्रथम स्थानी मानले आहे कारण हे तप आचरण्यास अन्य कोणत्याही तपापेक्षा फार कठीण आहे. अनशन तपात अशन म्हणजे आहाराचा त्याग असतो. जीभेवर विजय मिळवायचा असतो. भूक हीच संसारात दुर्जेय आहे. भूकेने व्याकूळ होऊन प्राणी वाटेल ते पाप करण्यास उक्तत होतो. म्हटले आहे - 'बुभुक्षितं किं न करोति पापं"
__मनुस्मृतीमध्ये एके ठिकाणी सांगितले आहे- अजीगर्त नावाच्या वरूपींनी भूकेने व्याकुळ होऊन आपला प्रिय पुत्र शुनःशेष याला यज्ञात आहुती देण्यासाठी विकून टाकले.३६० आणि विश्वामित्रासारखे वषीसुद्धा क्षुद्येने पीडित होऊन चाण्डाळाच्या हातातील कुत्र्याचे मांस खाण्यास उक्तत झाले.३६१ जोपर्यंत शरीर आहे तो पर्यंत भूक असणारच. या भूकेला जिंकणे आणि त्याबरोबर मनाला निग्रहित करणे अशी अनशन तपाची साधना आहे. या तपाच्या साधनेने शरीर व मनाची शुद्धी होते. शरीर अन् प्राण यांचा मोह सुटून जातो.३६२
दोन घडी अर्थात ४८ मिनिटपर्यंत आहार त्यागापासून सहा महिन्यापर्यंतच्या उपवासाला इत्वरिक तप म्हणतात.३६३ परंतु मूळ आगमात जिथे-जिथे अनशन तपाचे वर्णन येते तेथे कमीत कमी चतुर्थ भवत उपवासाला अनशन तप मानले आहे. यावत्कथित तप मरणकालिक (मृत्युपर्यंत) असते.२६४
___२) उणोदरी तप - तपाचा दुसरा भेद. ऊन-कमी, उदर-पोट, म्हणजे जेवणाच्या वेळी पोट थोडे रिकामे ठेवणे. भूकेपेक्षा कमी खाणे म्हणजे ऊणोदरी तप होय.
उत्तराध्ययन सूत्रात उणोदरी तपाचे पाच प्रकार सांगितले आहेत.
१) द्रव्य ऊनोदरी - आहाराचा मात्रा कमी करणे, भुकेपेक्षा कमी खाणे. मुद्दाम अगोदर निश्चय करून भूक असताना त्यापेक्षा कमी खायचे हे उणोदरीतप आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेपेक्षा कमी वस्त्र इ. ठेवणे.
२) क्षेत्र उणोदरी - भिक्षा मागण्यासाठी स्थान नक्की करून तेथूनच भिक्षा घेणे.
३) काल उणोदरी - भिक्षा आणण्यासाठी काल-समय निश्चित करून त्याच वळला भिक्षा मिळाली तरच घ्यायची. नाही मिळाली तर नाही.