________________
ला
RombinatasanilakandilaiGAADIEDOSRAJULINCIDENCERAMMARCH
HTHHATANEMAMBHIRRitisyaulicorials
मीना थांबवणे आवश्यक आहे. कारण फक्त तप केल्यानेच सर्व कर्माचा विनाश होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तलावातील पाण्याचे येण्याचे रस्ते जरी बंद केले तरी अगोदर व्यात असलेले पाणी नष्ट झालेच पाहिजे. ते पाणी सुकले पाहिजे. तलाव कोरडा फडफडीत झालाच पाहिजे. म्हणून प्रथम संवररूपी कवच धारण करून सम्यक्त्व रूप रथावर सवार होऊन श्रुतज्ञानरूपी धनुष्य घेऊन, संयमरूपी रणभूमित तप रूपी बाणांनी समस्त कर्मरूपी शत्रंना पराजित करून मोक्ष रूपी अनुपम राज्यश्री प्राप्त करावे.३५० ।।
__ जी व्यक्ती कषायरूपी शबूंवर विजय प्राप्त करून दुष्ट लोकांचे दुर्वचन, उपद्रव, अनादर आदींनी मन मलिन, कलुषित होऊ देत नाहीत. परंतु सर्व सहन करतात. त्यांची झपाट्याने जास्त निर्जरा होते. अशावेळी असे चिंतन करावे की, माझ्याच पूर्व जन्मीच्या पापाचे हे फळ आहे. हे जर आता शांततेने, समताभावाने सहन केले नाही तर कर्मरूपी ऋणातून कधीच मुक्त होणार नाही. म्हणून दुःख शोकाने पीडित होऊन आर्तध्यान करण्यापेक्षा समभावाने ते भोगावे. नाहीतर परत दुःख करीत बसलो तर नवीन कर्माची श्रृंखला चालूच राहील. अशाने अनेक भव वाढतच जातील.
स्वामी कार्तिकेयानुप्रेक्षामध्ये एकशे दोन गाथेपासून एकशे चौदा गाथेमध्ये निर्जरानुप्रेक्षाचे वर्णन करताना लिहिले आहे की आत्म्यामध्ये संश्लिष्ट कर्मांचे अंशत: जीर्ण होण्यासच निर्जरा म्हणतात. प्रत्येक जीवाची प्रतिक्षणी सामान्यतः कर्मांची निर्जरा होत असते. कारण ज्या कर्मांची परिवक्वता झालेली असते ती कर्मे आपले फळ दिले की निष्प्रभ होऊन आत्म्यापासून दूर जातात.
कर्मांची जास्तीत जास्त निर्जरा तपानेच होते. तपाच्या वारा प्रकारांचा उल्लेख करताना ग्रंथकार लिहितात की, या बारा प्रकारच्या तपाने कर्माची निर्जरा होते. याबरोबरच अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की, ज्ञानी साधकाने केलेले तपच निर्जरा करू शकते. अज्ञानाने केलेले तप निर्जराचे कारण होत नाही. उलट कर्मबंधनाचे कारण होऊ शकते. जर तप करून याचा अहंकार केला, स्वतःला मोठा तपस्वी समजले, तर कर्मबंधच होणार. इहलोकात प्रसिद्धी, सन्मान, प्रशंसा, तसेच परलोकात स्वर्गीय सुख मिळण्याची कामना करून जर कोणी तप केले तर आध्यात्मिक दृष्टीने ते निरर्थक आहे. या कामनायुक्त तपाला "निदान' म्हणतात. निदानाशिवाय केलेले तप खरे तप आहे. त्यानेच कर्माची निर्जरा होते. कर्माचा समूह कार्मण शरीर द्वारा उदयास आलेले किंवा मुद्दाम उदयास आणलेले "उदीरणा" अर्थात स्वतः संचित कर्माना उदयास आणायचे ते कर्मयोग समभावाने भोगायचे व ते