________________
माण केल्याने विषयाची उपलब्धी झाल्यावर आदर न करणे इंद्रिय प्रमादाचा विरोधी
ShTakali
आहे.
ज्याप्रमाणे शत्रूचे सैन्य शहराच्या चारी बाजूला असलेल्या खाई अर्थात किल्याच्या चारीबाज नाळे असले तर अशा सुरक्षित नगरीला नष्ट करू शकत नाही. त्याचप्रमाणे कर्मरूपी शत्रूची सेना गुप्ती आदी खाईने युक्त संयमरूपी नगरीला नष्ट करू शकत नाही. ही गुप्ती संवरामुळे शक्य होते.
समिती नावाच्या मजबूत नावेत आरूढ होऊन साधू षट्जीवनी कायेच्या जीवांची हिंसेच्या पापरूपी मगरीपासून दूर राहून संसार समुद्राला पार करतो.३१३
या प्रमाणे प्रमाद, कषाय, इंद्रिय इ. आग्नवांचा कशाने निरोध होतो असे चिंतन करून गुप्ती आणि समितीने संवृत्त होऊन सतत चिंतन करणे संवर भावना आहे.
कार्तिकेयानुप्रेक्षात पूर्व वर्णित संवराचे सत्तावन्न भेद यांचे संक्षिप्त उल्लेख आहे.३१४ पुढे गुप्ती इ. चा काय उपयोग आहे याचे वर्णन करताना लिहिले आहे की, मन, वचन, काया याच्या योगाच्या प्रवृत्तीला आळा घालणे यास गुप्ती म्हणतात. प्रमादाचा त्याग करणे म्हणजे समिति आहे. ज्यात दया मुख्य आहे तो धर्म आहे. तत्त्वांच्या चिंतनाला अनुप्रेक्षा म्हणतात. भूक वगैरे सहन करणे यास परिषहजय म्हणतात. आणि रागादी अवगुणांचा त्याग करून धर्मध्यान किंवा शुक्लध्यानाने आत्म्याचे आत्म्यात लीन होऊन जाणे म्हणजे चारित्र्य. जी व्यक्ती या संवराच्या कारणांचा विचार करून ही जर आचरण करीत नाही ती दुःखाने संतप्त होऊन चिरकालपर्यंत संसारात भ्रमण करते. परंतु जी विषयापासून विरक्त होऊन मनाला आकर्षित करणाऱ्या इंद्रियांच्या विषयापासून स्वतःला नेहमी दूर ठेवते. त्यात प्रवृत्ती करीत नाही. त्याच मुनींचे निश्चयपणे संवर होते. ३११
इथे एक गोष्ट विशेष ज्ञातव्य आहे की संवर तर विरतीमूलक आहे. परंतु संवराचे जे कारण सांगितले आहेत त्यात काही प्रवृत्तीमूलक सुद्धा आहेत. प्रवृत्ती निवृत्तीचे कारण कस होऊ शकेल ? परंतु इथे हे समजण्या योग्य आहे की ह्यात मुख्यतः निवृत्तीचीच आहे.
गुप्ती तर निवृत्तीचे मूल कारण आहेच. समितीमध्ये जी प्रवृत्ती आहे, ती सुद्धा आत्मजागरूकता मूलक आहे. म्हणून निवृत्ती मुख्य आहे त्या दृष्टीने हिला संवराचे कारण म्हटले आहे.
जो साधक प्रवृत्तीला वश करण्यात असमर्थ होतात, त्यांना प्रवृत्ती कशी करावी, त्याचे उपाय सांगण्याच्या उद्देशाने समितींचे महत्त्व आहे. शेवटी प्रवृत्ती तर थांबवल्याच