________________
(४४५)
आत्मविकासाच्या सीमापर्यंत पोहोचल्यावर त्याचा त्याग करणे ही आवश्यक आहे. पण जो प्रारंभापासून पुण्याला त्याज्य मानून त्याग करतात, त्यांची स्थिती किनाऱ्यापर्यंत जहाज पोहोचण्यापूर्वी मध्येच ती सोडून देणाऱ्या सारखी होते. मध्येच नाव सोडून देणारा समुद्रात बुडून मरणारच. मध्येच पुण्य त्याग करणारा संसार सागरात बुडणारच. २७२
अशाप्रकारे पुण्य हेय आणि उपोदय दोन्ही आहे.
आस्रव भावनेत ज्ञानियांनी पुण्यतत्त्वाला आनव अशासाठी म्हटले आहे की, जेव्हा साधक जग अनित्य आहे, अशरण रूप आहे हे जाणतो तेव्हा त्याचा दर्जा इतका उच्च प्रकारचा होतो की मोक्ष प्राप्तीच्या चिंतनाप्रत पोहोचतो. त्यावेळी पुण्याची काहीच आवश्यकता उरत नाही. त्यावेळी ते बंधनरूपच आहे. पुण्य ही शेवटी सोडावेच लागते. म्हणून पाप आग्रवाप्रमाणे पुण्याला ही आसव म्हटले आहे. परंतु जी व्यक्ती अजून धर्माचा क, ख, ग, सुद्धा जाणत नाही, पापापासून किंचित मात्र सुद्धा दूर रहात नाही, तो पुण्याला आस्रव मानून पुण्य प्रवृत्ती करीत नाही. पापप्रवृत्ती सोडीत नाही अशाने त्यांची काय दशा होणार 7
जैन परंपरेत एक प्रसिद्ध लोक आहे.
आसवो बंध हेतुश्व संवर मोक्ष कारणम् ।
इतीयमर्हति दृष्टिरण्यद सर्व प्रपंचणम् || २७३
Antage
-
ॐ
अर्थात आसव बंधाचे कारण आहे व संवर मोक्षाचे कारण आहे. सर्वज्ञाच्या दृष्टीत इतकीच गोष्ट महत्त्वाची आले त्याच्याशिवाय जी काही चर्चा विचारणा आहे, ती प्रपंच मात्र आहे. आनवाचे विस्तारपूर्वक विवेचन केले आहे. आता संवर भावनेचे विश्लेषण करू या. आसव तत्त्वाला व्यवस्थित जाणून त्याचा प्रतिपक्ष संवर या तत्त्वाला चांगल्या प्रकारे समजून घेऊन आस्रव द्वार बंद केले जाऊ शकतात.
संवर भावना
जैन दर्शनात दोन तत्त्वे अत्यंत महत्त्वाची आहेत आसव व संचर या दोन तत्त्वावर संसार व मुक्तीचा समग्र विस्तार अचलंविला आहे. समस्त जागतिक प्रपंच आनवाच्या श्रृंखलेत जोडलेले आहेत. सर्व साधना, आराधनाचे जे उपक्रम व्रत, संयम, संवराशी जुडलेले आहेत. या दोन तत्त्वांना व त्यातील वास्तविक सत्याला जी समजतो त्याला जैन तत्त्व व धर्माचे सार समजले. मिथ्यात्व अविरती, प्रमाद, कपाय आणि मन,
16.43//