________________
(४३७)
RESED
PageONHSSMA
प्राप्तीनंतरसुद्धा तेराव्या गुणस्थानात योग असतातच. चौदाव्या गुणरस्थानात अयोग अवस्था प्राप्त होते. तेव्हाच सर्वथा कर्मबंध अवरुद्ध होतात.
बचन आणि काययोगापेक्षा मनोयोगाचे बल फार अधिक आहे. मनाने अगदी थोड्या क्षणात खूप जास्त प्रमाणात कर्म बांधली जातात, त्याचप्रमाणे ते सुटूही शकतात.
तुंदलियामत्स मगरीमत्सच्या डोळ्यांच्या पापणीवर जन्मतो. तंदुल म्हणजे तांदुळ, तांदळाच्या दाण्याइतके लहान त्याचे शरीर असते. केवळ एक अंतमुहुर्त त्याचे आयुष्य असते, तो वचन आणि कायाची प्रवृत्ती तर करीत नाही. फक्त मनात हिंसेचा विचार करतो, की मगरीच्या इतका जर मी मोठा असतो तर मगरीच्या पोटात जाणाऱ्या जीवांपैकी एकालाही परत बाहेर जाऊ दिले नसते. खाऊन फस्त करून टाकले असते. परंतु ही मगर किती मूर्ख आहे. तोंडात जाणाऱ्या कित्येक माशांना, जलजंतूंना पाण्याबरोबर परत बाहेर टाकते. तंदुलिया मत्सने फक्त मनाने असे वाईट हिंसात्मक विचार केला, दुष्ट मानसिकताच्या चिंतनाने आपल्या एक मुहुर्ताचे आयुष्य पूर्ण करून तो सातव्या नरकात तेहतीस सागरोपमचे आयुष्य प्राप्त करतो.
प्रसन्नचंद्र राजाचे उदाहरण आपण अगोदर पाहिले आहे. त्यांच्यात एका तासात किती परिवर्तन झाले. हे सर्व मनातील वैचारिक परिवर्तनामुळेच. मनानेच खरे जास्त कर्मबंध होतात म्हणून मनाच्या दूषणांना प्रथम दूर करण्याचा पुरुषार्थ करायला पाहिजे. हे काम अतिशय कठीण आहे, तरी अशक्य नाही. "अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः' योगशाखात महर्षी पंतजली म्हणतात, अभ्यास आणि वैराग्याने चित्तवृत्तीचा निरोध होऊ शकतो.
आग्नवांवर विजय मिळवायचा असेल तर दृढ प्रयत्नाने मन निग्रह करण्याचा पुरुषार्थ करून वचन व कायाची प्रवृत्ती सुधारून क्रमशः आसवांचा निरोध केला पाहिजे.
तसे मन, वचन, कायाचे तीन योग आहेत. परंतु विस्तृतरूपाने योग पंधरा आहेत. हे विवेचन समजून घेतले तर सूक्ष्मातिसूक्ष्म आनवांचा निरोध करण्यात मदत मिळेल. म्हणून येथे पंधरा योगांचा उल्लेख करणे योग्य होईल. त्यांचे विवेचन शतावधानी श्री रत्नचन्द्रजी महाराजांनी केले आहे.
१) सत्य मनयोग - सत्य विषयी मानसिक प्रवृत्ती. २) असत्य मनयोग - असत्याविषयी मानसिक प्रवृत्ती. ३) मिश्र मनयोग - थोडी सत्य, थोडी असत्य मानसिक प्रवृत्ती.
RATHI
PRESIDE
HOONALSORDSMEEN
SeeindiaHindi