SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 335
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ 25ARANASI पण 'मी शरणागतांचा स्वीकार करतो' इतके जरी म्हटले असते किंवा स्वीकृती सूचक होकारार्थी मान जरी डोलावली असती तर इतरांचा अहंकार डिवचला गेला असता. साधकाची जेव्हा स्वतःची आपली तयारी होईल तेव्हा तो स्वतः अंतःकरणापासून बोलू लागेल- “अरिहंते सरणं पवज्जामि, सिद्धे सरणं पवजामि''-- शरण स्वीकार करतो. यात साधकाने खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन पाय उचलला आहे असे सूचित होते. शरण तो स्वीकारतो ज्याने अहंकाराचा पूर्णपणे त्याग केला आहे आणि जो अहंकाराचा त्याग करतो त्याला दुःख, द्वंद्व, भय चिंता रहात नाही. साधकाला हा अनुभव आला पाहिजे की - मेरा मुझमें कुछ नहीं जो कुछ है सो तोर । तेरा तुझको सौंपते क्या लगता है मोर ।। समर्थ गुरू रामदासस्वामींच्या शरणी समर्पित झाल्यानंतर शिवाजी, शिवाजी होऊ शकले. स्वामी विवेकानंदांनी स्वतःला स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या चरणी समर्पित केले नसते तर ते इतक्या उच्च स्थानी पोहोचले नसते. भक्त शिरोमणी मीराने स्वतःला श्री कृष्णांच्या चरणी समर्पित केले त्यामुळे ती श्रीकृष्णात इतकी तन्मय झाली की खाणेपिणे शरीराची चिंता सर्व-सर्व काही विसरून गेली. प्रस्तुत भावनेचे तथ्य हेच आहे की साधकाने आपल्यामध्ये वरजुता (सरलता) मृदुता आणि विनय आणण्यासाठी अहंकाराचा पूर्णपणे त्याग करावा व अहंकार तेव्हाच नष्ट होईल जेव्हा तो असा अनुभव करेल की, आपण सांसारिक पदार्थ, वैभव, पद इत्यादींना शरणरूप मानतो ते वास्तविक आध्यात्मिक दृष्टीने आत्मोत्थानाच्या दृष्टीने शरणरूप नाहीत. कारण ते सर्व नश्वर आहेत. आत्मा व परमात्माच फक्त शाश्वत. नित्य आणि परमशक्तीमय, आनन्दमय आहे. त्यांचे शरण घेणेच हितावह आहे. ह्या भावनेत हे लक्ष्यात ठेवायला हवे की अशरणतेचा विचार करणे म्हणजे आपल्याबद्दलची हीन भावना आहे असे समजू नये. हा तर सात्त्विकता पूर्ण विनितभाव आहे. जेव्हा आपण अवास्तविक, कल्पित शरणभूत पदार्थांचे शरण सोडू तेव्हाच ती भावना विकसित होते. अशरणभावना आत्म्याचा उत्थान करणारी आहे. संसार भावना - ज्या संसाराला मनुष्य नित्य, स्थिर, स्थायी मानतो आणि त्यात विभ्रांत राहतो. सत्यमार्गापासून भ्रमित होतो, तो संसार नित्य नाही. संसार
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy