________________
(७१४)
शुभ किंवा शुद्ध भावनेच्या विकासासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. आपल्या आजूबाजूचे वातावरण, असे असले पाहिजे की ज्याच्यामुळे पवित्र भावनांचा विकास होईल. पवित्र भावनेने मनुष्याचे मानसिक स्वास्थ्य स्वस्थ राहाते. पारिवारिक, सामाजिक, राष्ट्रीय व व्यावहारीक जीवनाच्या उन्नतीसाठी आणि भाव विशुद्धीद्वारा आत्मविशुद्धी करून चरम व परम लक्ष्याप्रत पोहोचण्यासाठी भावनेच्या शुद्धीची नितांत आवश्यकता आहे म्हणूनच प्रस्तुत शोधप्रबंधात भावनेच्या विविध प्रकारांवर विचार विस्तात केला आहे.
प्रकरण १ : 'जैन संस्कृति धर्म आणि वाङ्मय'
भारताची भूमी परम पवित्र भूमी आहे. ह्या पृथ्वीच्या कणाकणांमध्ये धर्म आणि मानवतेची भावना भरलेली आहे. अनेक धर्माची जन्मभूमी भारत आहे. हिंदू, जैन आणि बौद्ध इ. धर्म ह्या पुण्यपवित्र भूमीतूनच उत्पन्न झालेले महत्त्वाचे धर्म आहेत. जैन धर्माने विश्वाला अत्यंत विशिष्ट असाधारण भेट दिली आहे आणि जगाच्या जीवमात्राच्या सुखाची तसेच कल्याणाची मंगलभावना ह्या धर्मात निरूपित झाली आहे.
जैन धर्म ज्ञाती, जाती, देश, काळ, इत्यादी बंधनाने बद्ध नाही. हा गुणप्रधान धर्म आहे. व्यक्ती जन्माने श्रेष्ठ नाही कर्माने श्रेष्ठ आहे. भगवान महावीरांनी आत्मतत्त्वाच्या दृष्टीने जगातले सर्व जीव समान आहेत अशी मंगल विचारणा प्रस्तुत केली आहे. मोक्षप्राप्तीचा अधिकार जसा पुरुषांना आहे तसाच स्त्रियांना देखील आहे. विश्वाच्या नारी जातीसाठी आध्यात्मिक उन्नतीचे मंगलद्वार भगवान महावीरांनी खोलून दिले आणि नारीचा सुंदर गौरव केला. षट्काय जीवांच्या रक्षणाद्वारा जगाच्या लहानात लहान जीवालापण न मारण्याची आणि दुःख न देण्याची उत्तम भावना व्यक्त केली आहे.
प्रस्तुत प्रकरणात जैन धर्माने मानवाचे जे परम कल्याण केले आहे त्याचे प्रारंभी वर्णन केले आहे. अन्य धर्माप्रमाणे जैन धर्मात पण मानवाला विश्वाच्या जीवसृष्टीत सर्वोत्तम म्हटले आहे. आणि ह्या धरतीवरचे त्याचे आगमन व्यर्थ न व्हावे तसेच भवभ्रमण न करण्यासाठी व परम पदाच्या प्राप्तीसाठी उत्तम साधनापद्धती जैन धर्माने प्रस्तुत केली आहे. भारतीय संस्कृतीच्या दोन धारांमध्ये जैन संस्कृतीचे अलौकिक समर्पण आहे. वर्णित प्रकरणामध्ये जैन धर्माची प्राचीनता, जैन धर्मात काळचक्राची मान्यता, श्रमण संस्कृतीची विशेषता इत्यादी विषयांचे वर्णन केले गेले आहे.
जैन मान्यतेप्रमाणे अनंत चोविशी झाली आहे. त्यातल्या वर्तमान अवसर्पिणी काळच्या चोवीस तीर्थंकर आणि चरम तीर्थंकर भगवान महावीर विषयी विवेचन ह्या