________________
(८१०)
Matajist
हा दृष्टिकोण निश्चय नयाने जुडलेला आहे.
भावस्रवाभावमयं प्रपन्नो, द्रव्यानवेभ्यः स्वतः एव भिन्नः। ज्ञानी सदा ज्ञानमयैक भावो निरानवो ज्ञायक एक एव ।।२३६
भावानवाच्या सर्वथा अभावाला प्राप्त झालेले आणि द्रव्यानवाने तर स्वभावानेच भिन्न, असे ज्ञानी जे नेहेमी एक ज्ञानमय भावाने युक्त आहे, ते निरानव आहे, एक मात्र ज्ञायक आहे.
ज्ञानीमध्ये भावानवाचा अभाव आणि द्रव्याग्नवाची पण भिन्नता, अस्पष्टता असते. कारण द्रव्यानव पुद्गल परिणाम स्वरूप आहे आणि ज्ञानी चैतन्य स्वरूप आहे. अशा प्रकारे ज्ञानीला भावानव आणि द्रव्यानवाचा अभाव असल्याने निरानव आहे.
म्हणून ज्ञानमय क्रियेला मोक्षाचे पारंपरिक कारण म्हटले आहे. त्याला त्याच दृष्टिकोणात समजणे आवश्यक आहे. कारण तो तत्त्वतः कर्मगत आग्नव भाव नाही.
आस्रव शब्दाचा अर्थ वाहात्या पदार्थाचे येणे असा होतो, ज्याप्रमाणे झरोख्यातून वायू आणि नाल्याने वाहाते जल येते त्याचप्रमाणे कर्मवर्गणेचे येणे आस्रव आहे, जसे पाण्यात शेवाळे पाण्याच्या मळाच्या रूपात उपलब्ध होते तसेच आग्नवभाव पण आत्म्यात मळाच्या रूपात उपलब्ध होतो.
आस्रवाला इंग्लिशमध्ये Infolw of karmic matter म्हटले जाऊ शकते.
तत्त्वार्थ सूत्रात आनवाचे दोन प्रकार सांगितले आहे -
१) पुण्याग्नव २) पापानव. शुभ योगाला पुण्याचा आस्रव आणि अशुभ योगाला पापाचा आस्रव म्हटले आहे.२३७
नवतत्त्वामध्ये आनव तत्त्व एक आहे. त्याचे अनेक भेद प्रभेद आहे. आरनव म्हणजे कर्म येण्याचे कारण त्याचे चिंतन करून त्याला त्यागण्यायोग्य समजून त्याचे त्याग करणे आवश्यक आहे.
__पुण्य आणि पाप या दोन तत्त्वांचा नवतत्त्वांमध्ये वर्णन आहे. इथे आम्रवच्या रूपात ह्यांचे वर्णन आहे. ज्यांचा राग प्रशस्त आहे. अंतःकरणात अनुकंपेची वृत्ती आहे आणि मनात कालुप्य नाही. त्या जीवाला पुण्याचा आग्नव होतो.२३८ प्रमाद बहुल चर्या, मनाची कलुषितता, विषयांच्या प्रती लोलुपता, पर-परिती अर्थात दुसऱ्यांना त्रास देणे, आणि परनिंदा ह्याच्याने पापासवाचे आगमन होते.२३९