________________
(६६८)
पुन्हापुन्हा याच गोष्टीवर भर देतात की, शुभोपयोगामुळे जीवनाचे परम साध्य सिद्ध होत नाही. अष्टप्राभृतच्या भावप्राभृतमध्ये ते म्हणतात
"जो आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपात मग्न राहतो, आपल्या स्वरूपाचा अनुभव करून त्यात एकाग्र होऊन त्या अनुभव केलेल्या निर्मळ सहजात्म स्वरूपात श्रद्धा ठेवतो तो सम्यग्दृष्टी आहे, त्या आत्म्याला जो जाणतो ते सम्यग्ज्ञान आहे आणि आत्म्यात स्थिर होणे, चारित्र्यमय बनणे आचरण आणि स्वरूप रमणता हे चारित्र्य आहे. २४
आचार्य उमास्वातींनी सम्यग्दर्शन, सम्यग्ज्ञान आणि सम्यकचारित्ररूप रत्नत्रयांना मोक्षमार्ग म्हटले आहे. २५
जो जीव शुद्ध आत्म्याला जाणतो तो आत्म्याला प्राप्त करतो. अर्थात आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करतो. आत्म्याला पुण्यपापरूपी शुभभाव आणि अशुभ भावापासून दूर ठेवून दर्शन आणि ज्ञानात स्थित करतो. तसेच अन्य वस्तूंच्या इच्छांपासून विमुक्त होतो. जो आत्मा आसक्तीरहित असतो तो आपल्या आत्म्याचा आत्माद्वारा ध्यान करतो. तो कर्म आणि जो कर्माचे ध्यान, चिंतन करीत नाही, तो एकत्व - एकमात्र आत्माचे चिंतन करतो, अनुभव करतो. असे ध्यान करताना तो दर्शन ज्ञानमय तथा अनन्यमय स्वतंत्र होऊन अगदी अल्पकाळात कर्मापासून मुक्त होऊन जातो. २६
सम्यग्दृष्टी-युद्धभावापन्न जीव इंदियांद्वारे अचेतन तसेच चेतन द्रव्यांचा उपभोग करतो ते त्याचे कर्मनिर्जराचे कारण आहे. २७
या श्लोकामध्ये चेतन-अचेतन द्रव्यभोगामुळे निर्जरा होते असे म्हटले आहे. इथे प्रश्न उपस्थित होतो की, उपभोगामुळे तर कर्मबंधन होतात याने निर्जरा कशी होणार ? त्याचे समाधान असे की, सम्यग्दृष्टीला जे ज्ञान असते असा ज्ञानी रागद्वेषापासून दूर असतो. म्हणून तो सम्यग्दृष्टी भोग सामग्रीला परद्रव्य मानतो. योगासक्ती मुळीच नसते. त्यांच्याशी आपला मन, वचन, काया ते काहीही संबंध नाही अशाप्रकारे राहतो. त्याला हेही ज्ञान आहे की कर्मउदयाच्या निमित्ताने त्यांचा संयोग होतो तसा बियोगही होतो. चारित्र मोहाच्या उदयामुळे व्यक्ती पिडित होतो आणि स्वतः निर्बल असल्यामुळे रोग वगैरे पीडा सहन करू शकत नाही, तेव्हा चिकित्सा करतो, औषध घेतो. त्याचप्रमाणे भोगोपभोग सामग्रीने विषयरूपी रोगाची चिकित्सा होते. परंतु रोग्याला रोग चांगला वाटत नाही आणि औषधही चांगले वाटत नाही. त्याचप्रमाणे सम्यग्दृष्टी चारित्रमोहाच्या उदयाला तसेच भोगोपभोगाच्या सामग्रीला चांगले मानीत नाही. निश्चयदृष्टीने