________________
सम-मरणाच्या परंपरेला बाढवणारे आहेत. मैत्री इ. योग भावना चार आहेत. चार भावनांच्या चिंतनाने चार कषायांवर विजय मिळवता येतो उदा. मैत्री भावनेने क्रोधावर विजय
ज्याच्या जीवनात मैत्री आहे, जो प्राणिमात्रांवर मित्रता भाव ठेवतो, त्याला क्रोध येतच नाही. मित्राचा क्रोध येतच नाही. “मित्तिमें सब भूएसु" जगातील सर्व जीवांबद्दल माझ्या मनात मैत्री भाव आहे. या भावनेला भावित केले तर जगात आपला कोणी शत्रूच राहणार नाही. ज्याच्यावर आपण क्रोध करावा. प्रमोद भावनेने मानावर विजय
प्रमोदभावना जीवाला गुणग्राही बनवते. दुसऱ्यातील गुणांना पाहण्यासाठी विनय, विवेक, नम्रता इ. गुण स्वतःत असणे आवश्यक आहे. अभिमानी आपल्या स्वतःलाच मोठा समजतो, परंतु प्रमोदभावना जीवाला विनम्र करते. नम्र होऊन दुसऱ्याचे गुणानुमोदन केल्याने मान कषाय स्वतः शांत होतो. करुणा भावनेने मायावर विजय
ज्याच्या हृदयात करुणा आहे. तो दुसऱ्यांबरोबर मायाचार, कपटबाजी, धोका देणे असे निम्न श्रेणीचे आचरण करू शकणार नाही. करुणा, अनुकंपा तर समकितचे लक्षण आहे. सम्यक्त्वी जीव मायावी कसा असू शकेल ? अशा प्रकारे करुणा भावनाने माया स्वतःच नष्ट होते.
माध्यस्थ्य भावनाने लोभावर विजय
माध्यस्थ्य भावनांचे भेद आपण पाहिले. त्यात सुख-दुःख, प्रिय अप्रिय, जीवजड कोणाहीबद्दल न राग, न द्वेष. सुखात लीन व्हायचे न, दुःखात दीन लाचार व्हायचे. याचच नाव माध्यस्थ्य भावना. ज्याच्या जीवनात माध्यस्थ्यभावना आहे, तो लोभ कररूच शकत नाही. म्हणूनच माध्यस्थ्यभावनाने लोभावर विजय प्राप्त होतो.
अशाप्रकारे या चारभावना, चार कषायांना जिंकण्यासाठी आधाररूप आहेत. कषाय सतत आत्मिगुणांचे शोषण करतात. चार योगभावना चार कषायांना नष्ट करण्यासाठी
अग्नीचे काम करतात.
जीवनात धर्मप्राप्तीच्या अगोदर जीवात्मा केवळ स्व-सुखाची चिंता, स्वगुणाचाच प्रमोदभाव, स्व-दःखाबद्दल करुणा. परंतु पापाबद्दल मात्र उपेक्षा. परंतु जीवनात