________________
प्रश्नव्याकरण सूत्रामध्ये हिंसा, असत्य, अदत्तादान, अब्रह्म आणि परिग्रहाला अनादी आनव म्हटले आहे.२३३ आनव आणि संवर असे दोन द्वार प्रश्नव्याकरण सूत्रात आहे. प्रश्नव्याकरण सूत्राच्या उपसहारामध्ये लिहिले आहे की उपरोक्त पाच आसवाने जीव प्रतिक्षण कर्म रूपी रजकणांचा संचय करून चार गतिरूप संसारात परिभ्रमण करत राहतो. क्रोध, मान, माया, लोभ हे चार कषाय आहेत.
मन, वचन, काया हे तीन योग आहेत.
कषायचे मूळ दोन भेद आहेत - राग आणि द्वेष. द्रव्याने रंजित भावाला राग म्हणतात आणि अरंजित भावाला द्वेष म्हणतात. राग कषायचे दोन भेद आहेत माया आणि लोभ. द्वेप कपायचे दोन भेद आहेत- क्रोध, मान. राग द्वेषामुळे कर्माचा बंध होतो.
मिथ्यात्व, अविरत, आणि कषायच्या नंतर योगचे वर्णन करताना लिहिले आहे ह्या जीवाची सगळी प्रवृत्ती मन, वचन, कायाच्या योगाने होते असे म्हणतात. प्रत्येक योग शुभ आणि अशुभच्या भेदाने दोन प्रकारचे आहेत. आहार संज्ञा, भयसंज्ञा, मैथुनसंज्ञा, परिग्रहसंज्ञा अशुभ मनाचाच परिणाम आहे. आणि कृष्ण, नील कापोत ह्या तीन लेश्या आणि इंद्रियाने प्राप्त सुखात तृप्णा, इर्ष्या आणि विषाद इत्यादी भाव पण अशुभ मनाचा परिणाम आहे असे जिनेंद्रदेव म्हणतात. सर्व प्रकारचे स्थूल आणि सूक्ष्म राग, द्वेष, मोह, हास्य इत्यादी नऊ कषाय रूप परिणाम पण अशुभ मनच आहे.
भोजन-कथा, स्त्री-कथा, राज-कथा आणि देश कथा ह्या चारची कथा करणे अशुभ वचन आहे.
बांधणे, छेदन करणे, मारणे इत्यादी क्रिया करणे अशुभ काया समजले पाहिजे. ह्या अशुभ भावाने जीव कलुषित, आत्मविपरीत भावाने जुळलेला राहातो.. पुढे ह्या अशुभ भावाने विपरीत शुभ मन, वचन, कायाची चर्चा केली आहे. व्रत, समीति, शील आणि संयमरूप परिणाम होणे शुभ मन आहे.
जे वचन संसाररूपी बंधनाला कापण्यात कारणरूप आहे त्या वचनाला जिनदेवाने शुभ वचन म्हटले आहे. जिनदेव, जिनवाणी आणि शुभ कार्यासाठी जी चेष्टा केली जाते तो शुभ काया आहे.२३४
५७ व्या गाथेमध्ये आचार्य कुन्दकुन्दानी कर्माश्रवाची चर्चा केली आहे. त्यात सांगितले आहे की त्याच्याने जीव धोर संसारसमुद्रात निमज्जीत होतो - बुडून जातो.
RAKESHOLES