________________
जगात असे क्रूर वृत्तीचे पुष्कळ लोक आहेत. निस्वार्थ भावनेने उपकार करणारे र कमी लोक आहेत. उपकाराबद्दल प्रतिउपकार करणारे थोडे आहेत. जगात काही लोक असेही असतात ज्यांना दुसऱ्यांचे अहित करण्यातच आनंद वाटतो. असे क्रूर, दुष्ट पवत्तीच्या जीवांना पाहून आपल्या हृदयात त्यांच्याबद्दल द्वेष किंवा दुर्भावना होऊ नये मान माध्यस्थ भावना श्री. तीर्थंकर भगवानांनी सांगितली आहे.९८ आचारांग सूत्रात भ. महावीरांनी कथन केले आहे की,
उहिणं वहिया य लोगं से सव्व लोगंमि जे केई विष्णु ।।
अणुवीर पास निक्खित्त दंडा जे के सत्त पलियं चयंति ।।९९ आपल्या धर्मापासून विमुख असणाऱ्या लोकांबद्दलसुद्धा उपेक्षा भाव ठेवावा. उपेक्षामुळे विरोधिबद्दल सुद्धा उद्विग्नता होत नाही. अशा तटस्थ व्यक्ती जगातील समस्त विद्वानांत अग्रणी असतात. त्यांच्या तटस्थ राहण्यातच त्यांच्या विद्वत्तेचा निवास आहे. ते आग्रह ठेवीत नाही की माझेच विचार श्रेष्ठ आहेत. ते आग्रहाला सुद्धा परिग्रह मानतात. आपल्यावर विरोधकांनी केलेल्या मिथ्य आरोप किंवा लांछनाचा सुद्धा प्रतिकार करीत नाही. ही उपेक्षेची चरम सीमा आहे.
गोशालक जेव्हा भगवानांच्या समोर म्हणाला की, “तुम्ही जिन (जितेंद्रिय) नाही, मी आहे. मी सर्वज्ञ आहे'' तेव्हा भगवनांनी त्याच्या मूर्खपणाची उपेक्षा केली. माध्यरस्थ भावनेचे हे रूप तितिक्षा आहे. आपल्याजवळ सोने (सुवर्ण) असेल तर ते सुवर्णच राहणार. त्याला कोणीही पितळ म्हटले, तरी त्यात बदल होणार नाही. आणि माझ्याजवळील सोने सोनेच आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची बिल्कुल आवश्यकता नाही. ते तर आहेच. सिद्ध करण्याची जरूरीच काय ? त्यासाठी विरोधाची उपेक्षा करण्याने विरोध आपोआप नष्ट होऊन जाईल.१००
न कित्येक लोक इतके धूर्त, क्रूर आणि प्रपंची असतात की त्यांना समजावण्याच्या मानगडीत पडण्याने काहीच फायदा होत नाही. ते अत्याग्रही, कदाग्रही आणि दुराग्रही, असतात. अशा परिस्थितीत काही लोक उग्र स्वरूप घेतात. क्रोध, कलह आणि वाक्युद्ध सुद्धा करू लागतात. शिवीगाळ, मारामारीपर्यंत मजल जाते. जे केवळ हिंसेचेच कारण आहे. माध्यस्थ भावना अशा परिस्थितीत व्यक्तीला संतुलित राहण्याची प्रेरणा देते. ज्या व्यक्तीला वारंवार समजावले तरी तो ती सवय सोडत नाही, आपल्या हिताची गोष्ट तो