________________
(६४०)
लोकांचा सगळा रोष माझ्यावरच निघावा आणि माझे मन समता अमृतात डुंबावे, मी माध्यस्थ भावनेत टिकून रहावे. सर्वसंसार निर्मल होऊन जावा. म्हणून संकटांचा सामना करण्यात मला कोणतेही रंज दुःख वाटत नाही. सत अशी आहे माध्यस्थ भावनाची भूमिका !
माध्यस्थ भावनेचा आराधक जरी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करू शकला नाही, तरी कमीत कमी सहन करावे. सहिष्णू बनावे. मार्टिन लूथर सहिष्णू होते. भगवान महावीर इ. महापुरुषांची समता माध्यस्थ भावनाचे प्रतीक आहेत.
माध्यस्थ भावनेच्या चिंतनाने आपल्यात तटस्थ राहण्याची प्रवृत्ती होते. ही भावना विरोधियांच्यामध्ये अविरोध भावनेने जगण्याची कला शिकवते. मनातील क्लेश आणि अशान्तीपासून वाचविण्याचे कौशल्य शिकवते. आग्रह दुराग्रहाच्या चक्रातून वाचवते. आणि वैचारिक, धार्मिक, सामाजिक इ. क्षेत्रात उदारताचा व्यवहार शिकवते.९५
जेव्हा कोणाला सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्नात असफलता मिळते तेव्हा कधीही त्याचा खेद करू नये. आपण सद्भावनेने केलेले प्रयत्न यातच संतोष मानावे. जेव्हा निष्फलता मिळते तेव्हा मौन रहावे. मौन राहण्याने फार मोठी शक्ती असते. “मौनम सर्वार्थ साधनम्" मौन राहिल्याने वाणीमुळे होणाऱ्या पापापासून वाचू शकतो. निष्फलतेच्या अन्य कारणांचा सुद्धा विचार केला पाहिजे. जसे की “आपली काही चूक झाली आहे का ? स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान तर नाही ना ? किंवा असा ही विचार करावा की, माझे पुण्य कमी पडले असेल किंवा यशनामकर्म कमी असेल म्हणून चांगली हित शिक्षा दिली तरी कोणताच परिणाम झाला नाही. उलट आपलेच नुकसान झाले. अशाप्रकारे आपले समाधान करून घ्यावे. काही समभाव धारण करून स्वतःची पात्रता वाढवावी. आणि दुसऱ्यांना सल्ला देताना त्याच्या पात्रतेचाही विचार करावा. जर त्याने ऐकले नाही तर त्याची पात्रता नाही असे समजावे. प्रत्येक जीवाची गती त्याच्या कर्माच्या अधीन आहे. जापर्यंत त्याचे अशुभ संस्कार क्षीण होऊन शुभ संस्कार जागृत होत नाही. तोपर्यंत त्याची एकून घेण्याची मनःस्थिती तयार होत नाही अपात्राला दिलेला उपदेश म्हणजे दगडावर पाणी ओतण्यासारखे आहे. अगदी निष्फळ. माणसाची पात्रता नसेल तर त्याला समजावणे
वा कठीण आहे. परंतु उन्मार्गावर चालणारे जीव सुद्धा एकाद्या शुभक्षणी धर्माभिमुख ॐ शकतात. धर्माचरण करण्यात पुरुषार्थ करू लागतो. परिणामतः त्यांचे अशुभ कर्म पण होऊ लागते. सत्यधर्म पालन करण्याची पात्रता प्राप्त करतो. अशी आश्चर्यजनक