________________
(६२०)
गुणी होण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे- गुणज्ञ व्हावे.
ज्या व्यक्तीचे मन गुणानुरागाने आप्लावित आहे तो द्वेष, ईर्षा इ. दुर्गुणांचा त्याग रतो. दसऱ्याची उन्नती पाहून ते त्यांच्या पुण्याचे फळ मानून आपण ही सुकृत्य करावे की प्रेरणा घेतो. तो पापभीरू असतो. स्व-पर भाव नसल्याने स्वार्थावर विजय मिळवतो. जीवन, शरीर, यौवन इ. क्षणिक आहेत. असा विचार करतो की, मी त्या महानपुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करून, संसाराच्या खऱ्या स्वरूपाला समजून घेऊन, भोग उपभोगांचा याग करून जे गुण त्या महापुरुषांनी आपल्या अंगी बाळगले व कर्म समूहांना नष्ट केले. त्याचप्रमाणे मी ही करावे. गुणज्ञ व्यक्ती प्रत्येक गुणी व्यक्तींच्या गुणांचे चिंतन मनन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आणि त्यांच्या गुणांचे जीवनात अनुसरण करून आत्मसात करण्याची भावना करते. अशा प्रमोद भावनेने भावित होते.
धर्ममार्गात सर्वात प्रबल जर कोणते विघ्न असेल तर ते आहे प्रमोद. प्रमोद भावनेमुळे प्रमाद दोष नष्ट होतो. गुणानुरागी दृष्टीने गुणीजनांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि लोकप्रियता वाढते. दोषदृष्टी हे एक उग्र प्रकारचे विष आहे, जो जन्मोजन्मी जीवाला मारत राहतो. गुणदृष्टी असे अमृत आहे जो जीवाला अजर अमर बनवतो.
प्रमोद भावना विनय स्वरूप आहे. विनय धर्माचे मूळ आहे. तसेच प्रमोद भावना भक्ती स्वरूप सुद्धा आहे. भक्तीने सम्यग्दर्शन प्रकट होते म्हणूनच तर प्रमोद भावना धर्म तथा सम्यग्दर्शनाचे मूळ आहे. प्रत्येक गुण गुणवानांचे गुणगान केल्याने आत्मसात होते. प्रमोदभावना हा गुण सन्मान रूप असल्याने सर्व गुणांचे मूळ आहे.
करुणा भावना करुणेचा सिद्धान्त श्रमण संस्कृतीमध्ये फार विकसित झाला आहे. जैनदर्शनात अनुकंपा, करुणेचे रूप आहे. यास सम्यक्त्वाचे लक्षण म्हटले आहे. सम्यक्त्वीच्या हृदयात सहजपणे करुणाचा स्रोत झळकतो. तो कोणत्याही व्यक्तीला दुःखी कष्टी, पीडित पाहून दुःखी होतो. "अनुकूल कंपनं अनुकंपा' ही अनुकंपाची व्युत्पत्ती हाच अर्थ व्यक्त करते. मनात उत्पन्न झालेले कंपन किंवा व्यथा दूर करण्यासाठी तो पीडित व्यक्तीची पीडा दूर करण्यासाठी तत्पर होतो. असे केल्याने त्याला आत्मशांती मिळते. म्हणून अनुकंपा, करुणा करण कोण्या पीडितावर उपकार नाही. आपलाच उपकार आहे. कुणी व्यक्ती एखाद्या णाची, पीडिताची सेवा करतो तेव्हा त्यास आंतरिक तृप्ती, समाधान आनंदाची अनुभूती यावरून सिद्ध होते की. धर्माचे फळ केवळ परलोकातच गेल्यावर मिळते असे नव्हे