________________
(४१४)
आस्रवचे प्रकार
आगमामध्ये आसवचे पाच प्रकार आहे १) मिध्यात्व २) अविरति ३) प्रमाद ४) कपास ५) योग २२४
तत्त्वार्थ सूत्रामध्ये बंधचे हेच पाच हेतू मानले गेले आहे. २२५ प्रशमरति प्रकरणमध्ये पण ह्याच पाच भेदाने कर्माचा आस्रव होतो असा उल्लेख केला आहे. २२६ आचार्य कुंदकुंदाच्या मतानुसार आस्रव चार आहेत, त्यांनी उपरोक्त भेदामधून प्रमाद घेतले नाही ज्याचे पुढे विवेचन केले जाईल.
प्रमाद एक प्रकारचा असंयम आहे, म्हणून त्याचा अविरती अथवा कपायाच्या अंतर्गतच समावेश होऊ शकतो. म्हणून कुन्दकुन्दाचार्यांनी पाचच्या ठिकाणी चार आराव घेतले असतील असे प्रतीत होते.
आज ज्या भावनेने कर्माचा आस्रव होतो ते भाव पूर्वी बांधलेल्या कर्माच्या उदयाने होतो. म्हणून आजचे आस्रव पूर्व बंधचे कार्य आहे आणि तसेच पुढे होणारे कर्म बंधाचे कारण आहे, अशा प्रकारे बंधचे पूर्व आस्रव कार्य कारण भाव युक्त आहे.
जसे जे बी आज आपण पेरतो ते प्रथम वृक्षाचे काम करतात आणि पुढे फुटणाऱ्या अंकुरच्या कारण रूप आहे. तसेच आम्रवमध्ये बी आणि अंकुराप्रमाणे कार्य कारण भाव आहे, अनादी काळापासून पूर्व बंधामुळे आस्रव आणि त्याच्याने उत्तर बंध होतो.
ज्याप्रमाणे आजचे बी पूर्ववृक्षाचे आणि तो वृक्ष त्या बीयांच्या अशी परंपरा अनादिकाळापासून चालत आहे त्याचप्रमाणे आजचा आश्रय पूर्व बंधाने आणि तो बंध पूर्वीच्या आसवाने आणि तो आनव त्याच्या पूर्वीच्या बंधाने अशा प्रकारे आसव आणि बंधाचा संबंध अनादि काळापासून अखण्ड रूपाने आहे. २२७ नऊ तत्त्वांमध्ये बंधतत्त्व पण आहे. आस्रव द्वाराने आलेले कर्म जे आत्म प्रदेशाला आवृत्त करतात त्याला आपण कर्माचा बंध होतो असे म्हणतो.
थोडक्यात आनवची व्याख्या देताना पंडित विजयमुनिशानी लिहितात ज्या क्रियेने ज्या विचाराने आणि ज्या भावनेने कर्मबर्गणेचे (कर्म समूहाचे) पुदगल येतात ते आसव आहे. २२८
आव तत्त्वाला आस्रवद्वारपण म्हणतात. आत्मप्रदेशात कर्म प्रवेशाच्या द्वाराला आनवद्वार म्हणतात.
14