________________
(६१३)
ती करणारे, असे गुणधारक आहेत. आत्मज्ञानी, गुणग्राही, अल्पभाषी, स्थिर आसनशील, राणी. सदैव धर्मरूप वाटिकामध्ये आपल्या आत्म्याला रममाण करणारे आहेत. कित्येक तपस्वी असतात. कित्येक जवळ ज्ञान आणि तपाच्या शक्तीही नसते तरीही स्वधर्मी ची सेवा भक्ती करीत असतात. आहार, वसा शैय्या, आसन इ. देऊन लाभान्वित होतात. साता देतात
कित्येक सद्गृहस्थ तन, मन, धनाने साधु, साध्वी, श्रावक, श्राविका या चार तीर्थाची भक्ती करतात. धर्माची उन्नती करतात. आणि प्राप्त पदार्थांचा उपयोग सन्मार्गाकडे लावतात.
- अशाचप्रकारे उत्तमोत्तम अनेक गुणज्ञांचे दर्शन होतात, त्यांची प्रशंसा ऐकून प्रसन्न होणे तथा असा विचार करावा की, धन्यभाग्य की आमच्या धर्मात असे असे नररत्न होऊन गेले ज्यांनी धर्माची खूप प्रभावना केली व करीत आहोत. “अशा महापुरुषांची सदा जय होवो विजय होतो." असा विचार करून त्यांचा सत्कार, सन्मान करावा. त्यांना सुख द्यावे. कुणी त्यांची भक्ती केली आदर, सत्कार केला तर आपणास प्रसन्नता व्हावी. अशा अनेक सद्प्रयासाने प्रकट होणारी भावना म्हणजे प्रमोद भावना.५९
माणूस जसे चिंतन करतो, तसाच तो होतो. म्हणून प्रमोदभावनेद्वारा प्राचीन काळातील महापुरुषांच्या उज्ज्वल व पवित्र गुणांचे चिंतन सतत करीत रहायला पाहिजे. जी साधकाला विशाल आत्मिक शक्ती प्राप्त होण्यास पर्याप्त आहे.
प्रमोदभावना व्यक्तीसाठी डोळ्यांचे काम करणारी आहे. ज्याप्रमाणे डोळे रस्ता दाखवतात, म्हणजे आपण सुस्पष्टपणे पाहून चालतो. डोळ्याने पाहत चालतो म्हणून भीती नसते. तसेच प्रमोद भावना व्यक्तीच्या जीवनपथाची मार्गदर्शक आहे. त्याचे जीवन गुणगौरवाने संपन्न बनून आदर्श बनते. त्याची दृष्टी सत्यान्वेषी बनते. मग अशा व्यक्तीला संसारात कशाचे भय रहात नाही.
प्रमोदभावनेमध्ये चेहऱ्यावरची प्रसन्नता इ. द्वारा आंतरिक भावभक्ती प्रकट होते. त्या अवस्थेत मनात ईर्षा, द्वेष, घृणा, निन्दा इ.साठी स्थानच रहात नाही. गुणीजनांना पाहताच त्याचे हृदय कमल विकसित होते. मनमयूर नृत्य करायला लागतो. चेहऱ्यावर सात्त्विक हास्य दिसते. आणि सहज ही त्या गुणी व्यक्तीकडे अभिवादनासाठी हात जोडले
तात. अशाप्रकारे गुणग्राहकतेमुळे व्यक्तीचा आत्मिक विकास होतो. तो स्वतः गुणांचे जगार बनतो. आणि शेवटी समाजात, देशामध्ये, सर्वत्रच सर्वांसाठी पूजनीय बनतो.