________________
(६११)
AUR
।
Heteli
व्यक्ती चांगल्या कामात लावल्या जाणाऱ्या वेळेचा दुरुपयोग करून नष्ट करते. दसऱ्यांचे प आणि दुर्गुण पाहण्यामुळे व्यर्थ शत्रूच्या संख्या वाढवतो. त्यामुळे सतत भयक्रांत नी आणि आशंकित राहतो. सगळ्यात भयानक गोष्ट अशी की अशी व्यक्ती स्वतःची दी उत्कर्ष करच शकत नाही. आणि नाही दुसऱ्यांच्या उत्कर्षाला सहन करू शकते.
दोषदृष्टी असल्याने व्यक्तीची शांती नष्ट होऊन जाते. मनाची प्रसन्नता आल्हादभाव नष्ट होऊन जातो. अशा व्यक्ती सर्वज्ञ परमात्म्यातही दोष शोधू लागतात.
दोषदृष्टी असणारे लोक गुणांच्या ऐवजी दोषच शोधतात. त्यांना कोणाचेही चांगले झालेले पहावतच नाही. उदा. माशी विष्ठेवरच बसेल. कावळ्यासमोर पंचपक्वान्नाचे ताट ठेवले तरी तो शवावरच चोच मारेल. अशाचप्रकारे दोषदृष्टी मानव चांगुलपणा आणि गुणांनी भरलेल्या ताटाला लाथाडून दोषरूपी शवावर, विष्ठेवर नजर ठेवून आनंद मानतो.
दोषदृष्टीचा जोपर्यंत त्याग केला जात नाही. तोपर्यंत अंतरात्मामध्ये अहिंसा, सत्य, विनय, क्षमा, सेवा इ. कोणतेही गुण, सदगुण त्याच्यात टिकणारच नाहीत. ज्याला गुणवान बनायचे आहे त्याने सर्वप्रथम गुण आणि गुणींची प्रशंसा करायला पाहिजे. हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. गुणीजनांची प्रशंसा केल्याने नुकसान तर काहीच नाही उलट गुणीची प्रशंसा केल्याने गुणवानाचे गुण अधिक दृढे होतात. आपल्या गुणात वृद्धी करतात अशा प्रकारे प्रमोद भावनेमुळे स्व-पर उपकार साध्य होतो.
श्रावकाचे २१ गुण आहेत. त्यापैकी एक गुण गुणानुरागी असणे आहे. श्रावकाने तर गुणीजनांबद्दल प्रमोद भावना ठेवलीच पाहिजे. याने कर्म निर्जरा होते. आणि उत्कृष्ट गुणांचे अर्जन होते. तीर्थंकर गोत्र उपार्जन करण्याचे २० बोल आहेत. त्यातील प्रथम काही बोल परमेष्ठी, ज्ञानी ध्यानी, तपस्वीचे गुण कीर्तन करण्याचे आहेत.५६
- काही व्यक्ती अशा असतात की त्या एखाद्या व्यक्तीत गुण नसले तरी त्यांचे गुणगान गातात. प्रशंसा करतात. परंतु याला प्रमोद भावना म्हणता येणार नाही. वस्तुतः हा गुणग्राहक दृष्टी सुद्धा नाही. यालाच चापलुसी म्हणतात. खुशमस्कऱ्या म्हणतात. आपला स्वार्थ साधण्यासाठी हा कपटपणा म्हणता येईल.
ही प्रवृत्ती सामुहिक जीवनाच्या दृष्टीने घातक आहे. याने अयोग्य व्यक्तीला आदर-सन्मान मिळाल्याने ह्या चांगल्या गुणांची महत्ता कमी करतात. कावळ्याच्या चोचीला थान मढविले, त्याच्या पायांना माणिक मोती जडविले तरीही कावळाच राहिल, राजहंस
णार. कावळ्याला राजहंस बनविण्याचा प्रयत्न करणारे स्वार्थी असतात. जे खोटी