SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 212
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ HOIRATNIROMAN विश्वातील सर्व प्राण्यांबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करणे ही समतायोगाची साधना मैत्रीचा महिमा वर्णन करताना एक पाश्चात्य वैज्ञानिक एडिसन (Addison) म्हणतात Friendship improves happiness and abates misery, by doubling Aur joy, and dividing our gried मैत्री आपली प्रसन्नता दुप्पट करते दुःख हरवते. . आनंद वाढवते. विपत्ती सुद्धा कमी करते.४० _ मैत्रीचे व्यापक रूप विश्वमैत्री आहे. ज्याचा आत्मा विश्वमैत्रीच्या भावनेने ओतप्रोत होऊन जातो. त्याचे विचार, संकल्प, व्यक्तित्व व शक्तीचा दूरवर प्रभाव पडतो. कारण की विश्वमैत्रीचा पाया अहिंसेवर आधारित आहे. एकदा अहिंसेचे जीवनात पदार्पण झाले की दृष्ट, क्रूर, जीवसुद्धा सर्व परस्परातील वैरभाव विसरून जातात. मनुष्यप्राणिपासून क्षुद्र प्राण्यांपर्यंत सर्वांमध्ये पारस्परिक मैत्री निर्माण होते. __ मनुष्य इतरांपासून निःस्वार्थ शुद्ध प्रेमाची अपेक्षा करतो. परंतु जेव्हा त्याला ते मिळत नाही तेव्हा त्याच्या अंत:करणात उदासी व्यापते. प्रेम न मिळण्याच्या असफलतेमुळे त्याच्या चिंतनाचा प्रवाह सरळ मार्ग सोडून विरुद्ध मार्गाकडे वळतो. चिंतनाचे स्वरूप बदलून जाते. त्याचे मानसिक संतुलन बिघडते. विक्षिप्त, अर्धविक्षिप्त अवस्था होऊन जाते. पागलपनाचा मानसिक रोग मैत्रीच्या अभावामुळेच लागू होतात. त्याचा उपाय एकमात्र शुद्ध मैत्री, प्रेम भावना विकसित करणे हाच आहे. म्हणून रोज प्रार्थना करावी मैत्री भावनुं पवित्र झरणुं, मुज हैया मां वह्या करे । शुभ थाओ आ सकल विश्वमुं, एवी भावना नित्य रहे ।। मैत्री युक्त मानव क्रूर, विरोधी, शत्रू वाटणाऱ्या जीवांनाही आत्मीय मित्र व बंधू बनवू शकतात. ज्याच्या मनात मैत्रीभावना दृढ झाली तो क्रूर प्राण्यांच्या समोर आला तरा भयभीत, क्षुब्ध, चंचल होत नाही. अशा साधकाची मनस्थितीचे वर्णन करताना श्रीमद् राजचंद्रजी लिहितात एकाकी विचरतो वळी स्मशानमां वळी पर्वतमां वाघ-सिंह संयोग जो, अडोल आसने मनमां नही क्षोभतो, परम मित्रनो जाने पाम्यो योग जो ।४१
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy