________________
A
(४०८)
आज आपण हे सर्व कसे काय लिहू शकतलो असतो ?२१५
अशाप्रकारे दुर्लभ मनुष्यदेहाद्वारे धर्माराधना केली जाऊ शकते. जरी हे शरीर अशुचिमय असले तरी शुचिपूर्ण आत्मा ह्या शरीराच्या आत आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी देहाची माया सोडून ह्या देहाच्या मदतीने किती सार्थक कार्ये केली जाऊ शकतात ह्याचे सतत चिंतन केले पाहिजे.
कवी उमेशमुनी यांनी आपल्या रचनेत लिहिले आहे की हा देह
"घृणित वस्तु से ही उपजा है, घृणित वस्तु उपजाये ।
भरे पदार्थ भी ऐसे ही देख उन्हें घबराये ।
इसे कहे दुर्लभ जिन बोल कि बात जरा हिरदे से तोल ॥ २१६
ह्या अशुचिमय शरीरालाही दुर्लभ सांगण्याचे कारण हे आहे की ह्याद्वारे मुक्ती प्राप्त होते.
-
अशुची भावनेच्या चिंतनाने ह्या देहाचा राग नष्ट होतो, वैराग्य भावना उत्पन्न होते, प्रशम भावनेने अनासक्ती येते आणि आत्मा परमात्मदशेला प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे जातो. जर ह्या जन्मात परमात्मदशा प्राप्त करण्याचे लक्ष्य ठेवले नाही तर पुन्हा पुन्हा ह्यापेक्षा सुद्धा घृणास्पद अशुचिमय कृमी- किटक इत्यादींनी भरलेल्या अनेक भवांमध्ये जावे लागेल.
मल्लिनाथ भगवानांनी आपल्या शरीरासारखाच पुतळा करून सहा मोहांध राजांना अशुची भावनेद्वारा वैरागी बनवून संयम मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा दिली. हे शरीर ज्याप्रमाणे मोहांधाला संसारामध्ये भटकवतो त्याचप्रमाणे वैराग्याला अनंत सुख देण्यात ही सहायक होते.
उपरोक्त सर्व लेखकांच्या सांगण्याचा सारांश हाच आहे की स्वभावाने अशुचिमय देहाच्या ममत्वात दुर्लभ मनुष्य जन्म व्यर्थ घालविणे योग्य नाही.
अनित्य भावनेपासून अशुची भावनेपर्यंतचे संपूर्ण चिंतन संयोगी पदार्थांच्या चहूकडे फिरत आहे. उपरोक्त सर्व चिंतनाचे ध्येय संयोगी पदार्थापासून दृष्टी दूर करून स्वभावोन्मुख होणे हे आहे. सर्व आत्मार्थी शरीर इत्यादी संयोगी पदार्थाची अशुचिता आणि स्व स्वभावाची शुचिता चांगल्या प्रकारे समजून आणि संयोगापासून विरक्त होऊन 'स्व' स्वभावात रममाण झाले तर अनंत सुख प्राप्त होते.