________________
भारतीय वाङमयामध्ये धर्म शब्दाचा व्यवहार फार व्यापक आहे. आणि हा शब्द कटाच प्रिय पण आहे. हा कुठे नाही हाच प्रश्न आहे. आध्यात्मिक आणि दार्शनिक साहित्यात तर धर्म शब्द ओतप्रोत आहेच पण आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की ज्योतिष आणि आयुर्वेदिक इत्यादी विद्येत सुद्धा कोणत्या न कोणत्या प्रकारे धर्म शब्द आला आहे. ज्योतिष शास्त्रात प्रतिकूल ग्रहाच्या वाईट परिणामाला निप्फळ करण्यासाठी विविध धार्मिक क्रियेचे वर्णन आले आहे, तर आयुर्वेदमध्ये पण रोग दूर करण्यासाठी धार्मिक विधिचा आश्रय घेतला गेला आहे. राजनीति पण अनेकवेळा धर्माच्या आधाराशिवाय चालत नाही. कारण यद्धात विजय मिळवण्यासाठी मंत्र इत्यादी साधनेचा आधार घेतला जातो. अशा प्रकारे धर्माचा प्रभाव आपल्याला सगळीकडे दिसून येतो.
_धर्म शब्दाची परिभाषा करण्याची आवश्यकता रहात नाही. जसे 'आई' शब्द बोलल्यावर आई कोणाला म्हणतात ते सांगावे लागत नाही.
अज्ञान, अन्धविश्वास आणि कुसंगतीमुळे लोकांनी धर्मासारख्या पवित्र शब्दाबरोबर अनेक चुकीच्या मान्यता जोडल्या त्यामुळे आजच्या काळात धर्म शब्दाचा खरा अर्थ व लक्षण समजणे फारच आवश्यक झाले आहे. आणि म्हणूनच ह्या धर्मभावनेत विभिन्न लेखकाच्या मते धर्माचे जे निरूपण झाले आहे त्याचे थोडक्यात वर्णन केले आहे.
- अनेक ज्ञानी संतपुरुषांद्वारा झालेले हे धर्मभावनेचे विवेचन पाठकांच्या मनात हे भाव निश्चितपणे उत्पन्न करण्यासाठी मदत रूप होतात की- धर्म परमोत्तम आहे, परम कल्याणाकारी आहे. शाश्वत सुख देणारे आहे.
र जेव्हा व्यक्तीच्या मनात असे उदात्तभाव दृढ होतात तेव्हा त्याची धर्मात सहज प्रवृत्ती होऊ लागते आणि ही भावना जीवात्म्याला धर्माच्या प्रशस्त मार्गावर उत्तरोत्तर पुढे नेते. गफार
वीतराग परमात्मा महावीर भगवान यांनी अहिंसा, संयम, तपरूपी धर्माची पराकाष्टा आणि मंगलमयता दर्शवली आहे. कारण ह्या त्रिवेणी धर्म अनुष्ठान आत्मद्रव्यात अनत गुण प्रकट करतात म्हणून ते उत्तम आहेत. अशा मंगलमय धर्मभावनेत स्थिर राहुन अहिंसा हेच संयम आहे आणि संयमच अहिंसा आहे. अहिंसा साध्य आहे आणि साध्यच्या सिद्धीसाठी आवश्यक नियमाचे जे पालन केले जाते ते संयम आहे. असे उत्कृष्ट जे आचरण करतात त्यांना देवतापण नमस्कार करतात.
धर्माची महिमा, गरिमा, कल्याणकारिता इत्यादीचे चिंतन खरोखर अंतकरणाला