________________
(युद्धावस्था)
था) मत्यू रहित होतात. अनंतानंत काळापर्यंत सिद्धस्थानात विराजमान गहतात. पुन्हा कधीही परत संसार येतच नाहीत.
स्वामी कार्तिकेय यांनी निश्चयनय द्वारे लोकात आत्मावबोधाची प्रेरणा देण्याच्या दृष्टीने म्हटले आहे. आत्मा केवलज्ञान, केवलदर्शन, अनंतसुख, अनंतवीर्य इ. गुणांची अथवा सम्यक्त्व, दर्शन, ज्ञान, अगुरुलघु, अवगाहना, सूक्ष्मत्व, वीर्य अव्याबाध या आठ गुणांची अथवा चौऱ्याऐशी लाख गुणांची अथवा अनंत गुणांची आधारशीला आहे. सर्व द्रव्यात आत्मा हाच उत्तम द्रव्य आहे. कारण की, धर्म, अधर्म, काल, आकाश, पुद्गल हे अजीव द्रव्य आहेत. जड आहेत; अचेतन आहेत. फक्त जीव द्रव्य चेतन आहे. तोच फक्त वस्तुरूपाचा प्रकाशक आहे, ज्ञाता आहे, त्याचे लक्षण उपयोग आहे. जीव हा परमतत्व, अंतःस्तत्व आहे. बाकीचे अजीव आश्रव, बंध तथा पुत्र, मित्र, स्त्री, परिवार, शरीर इ. चेतन व अचेतन द्रव्य बाह्य तत्त्व आहेत. फक्त जीवच ज्ञानवान आहे. अन्य सर्व द्रव्य अचेतन असल्यामुळे ज्ञानरहित आहेत. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश व काल द्रव्य, हित, अहित, हेय, उपादेय, पुण्य, पाप, सुख, दुःख इ.चा अनुभव करू शकत नाहीत. जीवाचाच फक्त ज्ञान हा स्वभाव आहे. म्हणून तो सर्वोत्तम आहे.
___३४३ रज्जू प्रमाण लोकाकाश संपूर्णतः शरीरादी अनेक कार्य करण्याच्या शक्तीने युक्त तेवीस प्रकारच्या वर्गणारूप पुद्गल द्रव्यांनी भरलेला आहे. जे सूक्ष्म व स्थूल सुद्धा आहेत. जिनेश्वर देवांनी पुद्गल द्रव्याचे सहा भेद सांगितले आहेत- १. पृथ्वी २. जल 3. छाया ४. चक्षु यांच्या अतिरिक्त बाकीचे चार इंद्रियांचे विषय ५. काल तथा ६. परमाणू.
__यात पृथ्वी रूप पुद्गल द्रव्य बादर आहे. जो छिन्न-भिन्न केला जाऊ शकतो. तथा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी नेला जाऊ शकतो म्हणून बादर आहे.
जल बादर आहे. जो छिन्न-भिन्न तर नाही केले जाते. परंतु एका रस्थानावरून दुसऱ्या स्थानी नेले जाऊ शकते. म्हणून त्यास बादर म्हणतात.
छाया (सावली) बादर सूक्ष्म आहे. जिला छिन्न-भिन्न तर नाही करू शकतो. आणि एका स्थानावरून दुसऱ्या जागी नेऊ पण शकत नाही. म्हणून तिला बादर सूक्ष्म
BANNADAMRE
म्हणतात.
चक्षुइंद्रियाशिवाय अन्य इंद्रियांचे विषय जे बाह्य द्रव्य आहेत. उदा. गंध, रस, व शब्द हे सूक्ष्म बादर आहेत. कर्म सूक्ष्म आहेत. जे द्रव्य देशावधी आणि
परमावधीचा विषय असतात ते सक्ष्म असतात.