________________
(५०३)
युक्त अथवा अनंत चतुष्टय रूप गुण सहित स्वात्मोपलब्धी रूप सिद्ध अवस्था प्राप्त आत्मा लोकाच्या अग्रभागात अवस्थित सिद्ध परमेष्टी आहेत.
मिध्यात्व कर्माचा उदय, तीव्र कपायांचा आवेश यामुळे आत्मा आणि शरीर एकच आहे असा भ्रम असणे बहिरात्मा भाव सूचक आहे तसे तर जीव अनंतानुबंधी क्रोध इ. प्रबल कपायांनी संग्रथित असतो त्यामुळे शरीरालाच आत्मा समजतो हा त्याचा मिथ्या अनुभव आहे.
गुणस्थानाच्या दृष्टीने बहिरात्माचे उत्कृष्ट इ. भेद आहेत. प्रथम गुणस्थानात असलेला जीव उत्कृष्ट बहिरात्मा आहे. अर्थात् आत्मा आहे तो शरीराहून भिन्न आहे. आत्म्यातच परमात्मा बनण्याची शक्ती आहे, सदज्ञान म्हणजे आत्मा ह्यावर त्याची श्रद्धा नसते म्हणजे मिथ्याभाव त्यात ओतप्रोत भरलेला असतो. मिथ्याभाव त्याचा सुटतच नाही.
द्वितीय गुणस्थानात असलेला जीव मध्यम बहिरात्मा असतो. त्यात पहिल्या गुणस्थानापेक्षा प्रतिकूल भावाची न्यूनता काही अंशी कमी असते.
तृतीय गुणस्थानात असलेला जीव जघन्य बहिरात्मा आहे. त्याच्यात बहिरात्मभाव अजून कमी प्रमाणात असतात. या भेदांचा आधार मिध्यात्व आणि अनंतानुबंधी कपाय उदयाची तरतमाता आहे. मिथ्यात्वभाव असल्यामुळे शरीर इत्यादी परद्रव्यात जीव अहंकार करतो व ममत्व ठेवतो. तो शरीराच्या जन्माला आपला जन्म मानतो. आणि शरीराचा नाश म्हणजे आपला नाश मानतो. ४२१
जो जीव जिनेंद्र वाणीला सम्यक् प्रकारे जाणतो, समजतो, आत्मा आणि शरीराची भिन्नतामध्ये अटूट विश्वास ठेवतो. विश्वास ठेवतो. जे ज्ञान, आदर, सन्मान, कुळ, जाती, बल, ऐश्वर्य, तप तथा शरीरमद यांच्या सुष्टुता आणि उत्कृष्टतेला जिंकतो तो अंतरात्मा आहे. अंतरात्माचे पण तीन भेद आहेत उत्कृष्ट, मध्यम आणि जघन्य
जो जीव प्राणातिपात, मृणाबाद, अदत्तादान, अब्रह्मचर्य आणि परिग्रह ह्या पाच पापांपासून निवृत्त करणारे पाच महाव्रते आहेत. आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय व संस्थान विचय इ. धर्मध्यान एवं पृथकत्व वितर्क विचार, एकत्व वितर्क विचार इ. शुक्ल ध्यानात नेहमी लीन राहतात. प्रमादावर विजय मिळवतात. अशा अप्रमत्त संयत गुणस्थानापासून क्षीण-कषाय गुणस्थानाचे साधक उत्कृष्ट अंतरात्मा असतात.
श्रमणोपासकाच्या व्रतांचे पालन करणारे गृहस्थ व प्रमत्त गुणस्थानधारी मुनी मध्यम अंतरात्मा आहेत. त्यांचा जिन वचनात अनुराग असतो. ते उपशम स्वभावाचे.