________________
(५०१)
अनेक जीवांचे शरीर एकच असते. ज्यांच्या सर्व क्रिया एकसारख्या होत राहतात. ते निगोदिया जीव आहेत. त्यांचे दोन भेद आहेत एक नित्य निगोदिया, दुसरा इतरनिगोदिया. इतर निगोदियाला चतुर्गती निगोदिया पण म्हटले जाते. जो जीव अनादी काळापासून निगोदामध्येच त्याच अवस्थेमध्ये अनेककाळापासून तेथेच वास्तव्य करून राहिला आहे. त्याने त्रस पर्याय प्राप्तच केली नाही. त्यास नित्य निगोदिया म्हणतात. जो जीव त्रसपर्याय धारण करून सुद्धा नंतर निगोदातपण जातात त्यांना इतर निगोदिया म्हटले आहे.
साधारण वनस्पतीप्रमाणे प्रत्येक वस्पतीचे दोन भेद आहेत संप्रतिष्ठित प्रत्येक तथा अप्रतिष्ठित प्रत्येक. ज्या वनस्पतीच्या शरीरात बादर निगोदिया जीवांचा निवास होता त्यास प्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती म्हणतात. प्रत्येक वनस्पतीच्या शरीरात बादर निगोदिया जीवांचा निवास नसतो. त्यास अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती म्हणतात.
ज्या जीवांचा पृथ्वी, जल, अग्नी, वायूशी प्रतिघात होत नाही. ते सूक्ष्म कायिक जीव असतात. ज्यांचा यांच्याशी प्रतिघात होतो ते स्थूलकायिक जीव असतात.
पाच प्रकारच्या स्थावर काया असलेल्यामध्येच चादर आणि सूक्ष्म असे भेद होतात. त्रसकाय जीव तर बादरच असतात. सूक्ष्मकायिक जीव पृथ्वीमुळे अवरुद्ध होतात. ते पाण्यात वाहत नाहीत. अग्नीने जळत नाहीत. हवेने आपटत नाहीत. इतकेच नव्हेतर वज्रपटल सुद्धा त्यांना थांबवू शकत नाही. आणि जे जीव भिंतीमुळे थांबू शकतात. पाण्यात प्रवाहित होतात. अग्नीत जळून जाऊ शकतात. वायूने आपटले जातात. ते बादर कायिक जीव असतात.
ज्यांचा अस नामकर्माचा उदय होतो त्यांना त्रस जीव म्हणतात. यांचे दोन भेद विकलेन्द्रिय आणि सकलेन्द्रिय, द्विइन्द्रिय, तेइन्द्रिय, व चऊरिन्द्रिय जीवांना विकलेन्द्रिय म्हणतात. द्विइन्द्रिय जीवांना दोन इन्द्रिय स्पर्शन व रसन असतात. शंख इ. जीव यात येतात. तेइन्द्रिय जीवामध्ये स्पर्शन, रक्षण, प्राण असे तीन इंद्रिय असतात. मुंगी, ढेकूण
3
इ.या श्रेणीत येतात. चार इंद्रिय म्हणजे स्पर्शन, रसण, घ्राण आणि चक्षु असतात यात मौरे, माशी डास इ. जीव या श्रेणीत येतात. दोन इंद्रियांपासून चार इंद्रियांपर्यंतच्या जीवामध्ये सर्व इंद्रिये नसतात म्हणजे पाच इंद्रिये नसतात म्हणून त्यांना विकलेन्द्रिय
म्हणतात.
L