________________
आधारीत आहे. लोक सर्वथा नित्य आहे असे म्हणणे म्हणजे एकांतवादाची केल्यासारखे आहे. याचे समाधान करताना म्हटले आहे की, परिणमन करणे वस्तूचा भाव आहे. त्यानुसार 'लोक' याचे ही परिणमन होते. परिणमनाची स्थितीला पर्याय दरले जाते. द्रव्याची परिभाषा करताना म्हटले आहे की जे पर्यायांच्या द्वारे प्राप्त केलं जाते ते द्रव्य होय. जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे सहा द्रव्य आहेत त्यात उत्पाद विनाश आणि ध्रौव्य रूपाने प्रतिक्षण परिणमन होत राहते. सहा द्रव्यांचा प्रती समय पूर्व पूर्व पर्याय नष्ट होत जातो. आणि उत्तर उत्तर पर्याय उत्पन्न होत राहते. यालाच उत्पाद तथा व्यय म्हणतात. द्रव्यात द्रव्यत्व ध्रुव आहे. ते त्यातून कधीच नष्ट होत नाही. भूत, भविष्य, वर्तमान काळात अनंत पर्याय रूपाने परिणमन करीत राहणे. द्रव्याचा स्वभाव आहे. म्हणून ते नित्य असूनही परिणमनशील आहे. म्हणून पर्यायाच्या दृष्टीने ते अनित्य सुद्धा आहे. या प्रमाणे स्याद्वादाचे खंडन होऊ शकत नाही. लोकातील द्रव्य आपल्या स्वभावाच्या दृष्टीने नित्य आहे. स्वभाव पर्याय व विभाव पर्यायाच्या रूपाने प्रतिसमय परिणमन होत राहण्यामुळे परिणामी किंवा अनित्य आहे. म्हणून जैन दर्शनात परिणामी नित्यत्वलास्वीकार केले आहे. एकांत दृष्टीने द्रव्याला केवळ नित्य म्हणणे अयोग्य होईल आणि केवळ अनित्य म्हणनेही योग्य होणार नाही.४१६
- जैनदर्शनातील हा नित्यत्ववादाचा सिद्धान्त अतिशय महत्त्वपूर्ण आणि तत्त्वानुसंधानासाठी अतिशय उपयोगी आहे.
याबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की, वस्तू अनेक धर्मात्मक असते. त्याचे अनेक धर्म व गुण असतात. जर एखाद्या वस्तूत भेदाने अनेक धर्म स्वीकारले नाही तर त्या वस्तूचे आस्तित्वच सिद्ध होणार नाही. वेगवेगळ्या दृष्टीने पाहिल्यास विरोधी वाटणारे धर्म सुद्धा एका ठिकाणी निर्विरोध राहू शकतात. उदा. पिता, पुत्र, भाऊ, जावई वगैरे लौकिक संबंध परस्पर विरोधी वाटतात. परंतु वेगवेगळ्या पारस्परिक संबंधाच्या दृष्टीने हे सर्व संबंध एका मनुष्याच्या बाबतीत ही असू शकतात. त्याचप्रमाणे प्रत्येक द्रव्यात नित्यत्व आणि अनित्यत्व वगैरे सिद्ध होऊ शकतात.
तात्पर्य हे की, द्रव्यांच्या समूहाचे नावच 'लोक' आहे. ज्याप्रमाणे द्रव्य नित्य आहे त्याचप्रमाणे 'लोक' सुद्धा नित्य आहे. ज्याप्रमाणे द्रव्य परिणमनशील आहे. त्याचप्रमाणे भारणामा परिणमनशील आहे. परिणमनशीलता अनित्यत्व द्योतक आहे.
जन दर्शन अनेकांत सिद्धांतावर आधारित आहे. स्यादवादाच्या भाषेत 'लोक' द्रव्यांचे