________________
(३५)
होते त्यांनी निर्ग्रन्थ-निर्ग्रन्थीणी, श्रमण-श्रमणीला पाच महाव्रत आणि त्यांच्या भावनेचा उपदेश दिला.२१
भगवान ऋषभदेवांच्या नंतर तेवीस तीर्थंकार झाले ज्याच्यात १) अजितनाथ २) संभवनाथ ३) अभिनंदन ४) सुमतिनाथ ५) पद्मप्रभू ६) सुपार्श्वनाथ ७) चंद्रप्रभू ८) सुविधिनाथ ९) शीतलनाथ १०) श्रेयांसनाथ ११) वासुपुज्य १२) विमलनाथ १३) अनंतनाथ १४) धर्मनाथ १५) शांतिनाथ १६) कुन्थुनाथ १७) अरहनाथ १८) मल्लिनाथ १९) मुनिसुव्रत २०) नमिनाथ २१) अरिष्टनेमी २२) पार्श्वनाथ २३) महावीरस्वामी आहेत.
ज्यांनी निर्ग्रन्थ प्रवचनाची अथवा जैन धर्माची आपल्या आपल्या काळात देशना दिली - उपदेश दिला. त्याचे वर्णन निरनिराळ्या ग्रंथात प्राप्त होते. विस्तारभयाने इथे ते दिलेले नाही. इथे मात्र भगवान ऋषभदेव, जे वर्तमान युगाचे आदी धर्मप्रवर्तक होते. त्यांचे थोडक्यात विवेचन केले आहे, आणि अंतिम तीर्थंकर भगवान महावीर होते, ज्यांच्याद्वारे समुन्दोधित धर्म आणि संप्रतिष्ठापित चतुर्विध धर्मतीर्थ आजही विद्यमान आहे. त्यांचे संक्षिप्त वर्णन इथे केले जाईल.
.. १३. २४ वे तीर्थंकर श्रमण भगवान महावीर
वर्तमान जैन संप्रदाय श्रमण भगवान महावीरांबरोबर जोडलेला आहे. श्रमण भ. महावीरांच्या विशेषतेचा आगमसाहित्यात अनेक ठिकाणी उल्लेख झालेला आहे. आगमात त्यांना स्वयंसंबुद्ध, पुरुषोत्तम, पुरुषसिंह, पुरुषांमध्ये पुंडरिक, पुरुषांमध्ये गंधहस्ती, अभयप्रद, चक्षुप्रद आणि शरणप्रद इत्यादी अनेक उपमांनी अलंकृत केले आहे.२२ त्यांच्या संघात अकरा गणधर आणि अनेक प्रतिभासंपन्न, तेजस्वी, मनस्वी यशस्वी श्रमण होते.
HARE
महावीर कालीन सामाजिक स्थिती - भगवान महावीर ज्या काळात होऊन गेले त्याकाळात संस्कृतीच्या विशाल सागरामध्ये विविध विचारधारेचे संमिश्रण झाले होते. संस्कृती कुत्सित आणि बिभत्स स्वरूपाची झाली होती. त्यांच्या अंत:करणातील लोककल्याणाची भावना विकृत झाली होती. धर्माच्या नावावर कर्मकांड वाढले होते. यज्ञाच्या नावावर मूक पशुंचा बळी दिला जाता होता. वर्णाश्रमव्यवस्था विस्कळीत .. झाली होती. स्त्रियांना निम्न कोटीचे मानले जात होते. त्यांना सामाजिक प्रतिष्ठेचा काणताच अधिकार नव्हता. अपरिग्रह आणि अनेकांत भावनेचे स्थान परिग्रह आणि
HESAMACHAR