________________
(३९२)
आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर तो शरीराला 'पर' पदार्थ किंवा नष्ट होणारा 'स्व'हून भिन्न आहे असे मानतो. तेव्हा शरीराच्या चिंतेपासून, क्लेशापासून मुक्त होतो. 'अंतकृदशांग' सूत्रामध्ये देवकीनंदन त्रिखंडाधिपती श्रीकृष्णाच्या लहान भावाचे वर्णन आले आहे. त्यांचे नाव गजसुकुमारमुनी, बाविसावे तीर्थंकर भगवान अरिष्टनेमी यांचा उपदेश ऐकून त्यांच्या जीवनात वैराग्याची ज्योती जागृत झाली आणि सोळा वर्षाच्या वयात त्यांनी भगवान अरिष्टनेमींकडून दीक्षा घेतली. गजसुकुमारमुनींचा आत्मविश्वास इतका प्रबळ होता की ज्या दिवशी दीक्षा घेतली त्याचदिवशी भिक्षूंची बारावी प्रतिमा जी अध्यात्ममार्गाची सर्वोत्कृष्ट साधना आहे ती स्वीकार केली. ह्या साधनेत साधकाला एक रात्र स्मशानात ध्यानस्थ राहण्याची विधी आहे. त्यांच्याबरोबर कोणतेच मुनी राहत नाही आणि जे काही मनुष्य, तिर्यंच, देव संबंधी उपसर्ग येतात ते त्याला शांतीने सहन करावे लागतात.
गजसुकुमारमुनी भगवान अरिष्टनेमी यांची आज्ञा घेऊन निर्द्वद्व आणि निर्भय होऊन आपली साधना करण्यासाठी स्मशानात गेले. भूमीचे परिमार्जन केले आणि ध्यानामध्ये, आत्मभावनेमध्ये लीन झाले. ते ध्यानामध्ये इतके तन्मय झाले की त्यांना काहीच कळले नाही की कोण येत आहे, काय करीत आहे.
श्रीकृष्णाने गजसुकुमाराच्या विवाहासाठी सोमिल ब्राह्मणाची कन्या सोमाला राज्यकुळाचे योग्य शिक्षण देण्यासाठी आपल्या राजमहालात ठेवली होती. सोमिल लग्नाची तयारी करीत होता. त्याचदिवशी संध्याकाळी हवन इत्यादी कार्यासाठी लाकूड आणण्यासाठी त्याच स्मशानाच्या दिशेने निघाला. तेथे गजसुकुमाराला मुनींच्या वेशामध्ये ध्यानस्थ उभे पाहून त्यांच्या डोळ्यातून अग्निवर्षा होऊ लागली. तो आपल्या मनात विचार करू लागला की, 'हा किती दुष्ट व्यक्ती आहे, जो माझ्या कन्येचा त्याग करून साधु झाला. त्याच्या मनात प्रतिशोधाची भावना निर्माण झाली. आणि त्याने लगेचच ओली माती आणून मुनींच्या डोक्यावर मातीची पाळ बांधली. आणि त्याच चितेमध्ये असलेले जळते अंगारे आणून टाकले आणि तेथून निघून गेला. मुनींचे डोके जळू लागले. त्यांच्या शरीरात तीव्र वेदना होऊ लागल्या. तरी मुनींच्या चिंतनधारेचा स्रोत निरंतर गतिशील होत राहिला. कारण त्यावेळी मुनींची आत्मचेतना देहात नव्हे परंतु आत्म्यामध्ये केंद्रित झाली होती. त्यावेळी अन्यत्व भावनेचे चिंतन करता करता मुनी विचार करू लागले की ह्या संसारामध्ये माझा कोणीही शत्रू नाही आणि कोणी मला जाळतही नाही. वास्तविकत: राग-द्वेष आणि कषायच आत्म्याचे प्रबळ शत्रू आहेत. तेच अहोरात्र शरीराला जाळत