________________
(३९०)
त्या पर्यायाच्या अनुरूप कार्य केले. परंतु शेवटी एकही रूप कायमचे राहिले नाही. सर्व आपापल्या ठिकाणी आणि आपापल्या कालावधीत नष्ट झाले. चैतन्य सर्वांपासून वेगळेच राहिले.
हा आहे कर्माचा तमाशा. आता ह्या मनुष्य जन्मात बुद्धी मिळाली आहे तर कर्माच्या नशेला उतरवून जागृत व्हायचे आहे. कर्माच्या विचित्रतेला समजून घेऊन भेदविज्ञानी बनायचे आहे. विभावाला सोडून 'स्व' भावात रममाण व्हायचे आहे. सतत त्याचेच चिंतन करायचे आहे.
हे जीवा ! जगातील सर्व पदार्थ तुझ्याहून भिन्न आहेत. तुझा त्याच्याबरोबर काहीच संबंध नाही. म्हणून 'स्व' स्वरूपाला ओळख. तू शुद्ध आहेस. सत् आहेस, सच्चिदानंदी आहे, सिद्धस्वरूपी आहेस असे चिंतन केल्याने आपले खरे स्वरूप प्राप्त होते. १८४
तत्त्वज्ञान स्वरूपज्योतीचा दिव्य प्रकाश प्रकट झाल्याने जीव स्वात्मस्वरूपाला ओळखू लागतो. 'पर' द्रव्याला ग्रहण करीत नाही. ज्याप्रमाणे लोक 'पर' वस्तूला 'ही परवस्तू आहे' असे समजल्यावर त्याचा त्याग करतात तसेच सर्व 'पर' द्रव्याच्या भावनेला 'हे परभाव आहे' असे समजून त्याला सोडून देतात. जोपर्यंत 'पर' वस्तूला चुकून स्वतःची मानली जाते तोपर्यंतच ‘ममत्व' राहते आणि जेव्हा यथार्थ ज्ञान होते तेव्हा तो दुसऱ्यांच्या वस्तूंबद्दल ममत्व कसे ठेवेल?
जसे एखादी व्यक्ती धोबीच्या घरातून भ्रमामुळे दुसऱ्यांचे कपडे आणते आणि स्वतःचे समजून शरीरावर धारण करते. परंतु जेव्हा दुसरा त्याला सांगतो की तू सावध हो, हे वस्त्र माझे आहे. वस्त्रांची बदली झाली आहे. माझे मला वस्त्र देऊन टाक. तेव्हा सर्व खुणांचे चांगल्याप्रकारे निरीक्षण करून नक्कीच हे वस्त्र दुसऱ्यांचे आहे असे समजल्यावर तो लगेचच त्या वस्त्रांना सोडून देतो, देऊन टाकतो. तसेच ज्ञाना सुद्धा भ्रमामुळे 'पर' द्रव्याला आपले समजून बसतो. परंतु जेव्हा सत् गुरू त्याला 'पर' भावाचे लौकिक ज्ञान, भेदज्ञान करवून त्याला आत्मभावात एकाग्र होण्याचे सांगतात तेव्हा आत्मज्ञानच तुझा स्वभाव आहे अन्य सर्व 'पर' भाव आहे असे समजून ज्ञानी सर्व 'पर' भावाला तत्काळ सोडून देतात.
आचार्य कुंदकुंद लिहितात की जो आत्मा अशाप्रकारे जीव आणि पुद्गलाच्या आपापल्या चेतनत्व स्वभावाद्वारे 'स्व - पर' भावाला समजत नाही. तोच आत्मा 'हा मी