________________
(३८६)
आहे. 'पर' परिणति 'पर' घर आहे. प्रायः लोक धर्माचे पालन सुद्धा 'धन, स्वजन, शरीर आणि परिवाराच्या सुखाची कामना ठेवून करतात. त्यांचे प्रेम परमात्म्यावर नसते. परमात्म्याला स्वार्थसिद्धिचे साधन मानलेले आहे. शांती कोठून मिळणार ?
जोपर्यंत आत्मा आणि परमात्म्याचे भावात्मक मिलन होत नाही तोपर्यंत शांती, समता, समाधी आणि प्रसन्नतेची आशा फलित होणार नाही. बाह्य धर्मक्रियेच्या अपेक्षेने आंतरीक भाव क्रिया विशेष फलदायक असते.
ज्याप्रमाणे जन्मानंतर मरण आणि मृत्यूनंतर पुनर्जन्म निश्चित आहे, जोपर्यंत सिद्धगती प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्ममरण निश्चितच आहे, त्याचप्रमाणे स्वजन, शरीर, धन, परिजन ह्यांच्या आकर्षणाने अथवा ममत्वाने दुर्गती निश्चितच आहे. ह्याचे कारण सांगताना आनंदघन यांनी एका काव्यात सांगितले आहे -
हम तो कब हुं न निज घर आये
पर घर फिरत काल बहु बीतो नाम अनेक धरायो । अनादी काळापासून 'पर' घरात फिरता फिरता आपले घर कोणते आहे ? कोठे आहे ? ते पाहिलेच नाही. आपल्या घरात कधी आलोच नाही 'पर' घरातच अनेक नाव संज्ञा प्राप्त केल्या. कधी एकेन्द्रिय तर कधी पंचेन्द्रिय, कधी पृथ्वी, पाणी तर कधी किडे मुंगळे यांच्या रूपात फिरलो. अनेक नाव, अनेक जाती, अनेक शरीर प्राप्त झाले कारण 'पर' घरातच फिरत राहिलो. आता काही पुण्याच्या उदयाने मनुष्य जन्म मिळाला आहे. समजत असताना सुद्धा शरीर आणि आत्म्याला एकच सांगितले तर ते मिथ्यात्व आहे. मनुष्य बुद्धिशाली प्राणी मानला जातो. परंतु जोपर्यंत तो बुद्धिला योग्य दिशेने नेत नाही आणि भेदज्ञान प्राप्त करीत नाही तोपर्यंत 'स्व' घरापर्यंत तो पोहचू शकणार नाही. 'स्व-घर' आपला आत्मा आहे. तेथे पोहचल्यानंतर पुन्हा यावे लागत नाही तेथे परमसुख, परमानंद प्राप्त होईल. ते घर शाश्वत, सुंदर आणि सदैव नवे राहील.
ज्याप्रमाणे जीव शरीराहून भिन्न आहे त्याचप्रमाणे तो स्वजनांहून सुद्धा भिन्न आहे. स्वजन-परिजनांचे संबंध बहुधा स्वार्थमूलक असतात. त्यांना आपले मानण्याची चूक करू नये. अनादीकाळापासून जीव हीच चूक करीत आला आहे. आता ह्या जन्मात त्या चुकीची पुनरावृत्ती करायची नाही.
श्री जयसोममुनींनी संसारात जन्म-मरणाच्या संबंधाने आणि त्यातून सुटण्याचे वर्णन करताना लिहिले आहे - हा संसार मोठा समुद्र आहे. त्यात दुःखरूपी पाणी भरलेले