________________
एRMANEESH
RA
म
B
HASTERNATA
(३६८)
प्रबळ होते आणि वृत्ती सहजतेने स्वभावोन्मुख होते. हे एकत्व भावनेच्या चिंतनाचे सुंदर फळ आहे. एकत्व हा वस्तूचा त्रैकालिक स्वभाव आहे आणि त्याचे चिंतन, मनन, अनुभावन, एकत्वभावना आहे.
एकत्वभावनेच्या चिंतनाने आनंद जागृत झालाच पाहिजे. जर चिंतन करताकरता आत्मिक आनंद मिळाला नाही तर आपल्या चिंतनप्रक्रियेवर सखोलतेने विचार करायला पाहिजे. जर आपल्या चिंतनप्रक्रियाची दिशा बरोबर असेल तर आनंद होईलच.
जेव्हा आपण असा विचार करतो की कोणीच साथ देत नाही तर आपल्यात द्वेष उत्पन्न होतो. परंतु जर असा विचार केला की कोणी साथ देऊच शकत नाही तर सहजतेने उदासीनता उत्पन्न होईल, वीतराग भाव जागृत होईल.
साथसहकाराची कल्पना केवळ कल्पनाच आहे. साथ सत्य नाही किंवा असत्य सुद्धा नाही, शिव किंवा अशिव नाही. सुंदर नाही किंवा विद्रूप नाही कारण जेव्हा ती कल्पनाच नाही तर मग ते आहे तरी काय ? कसे आहे ? इत्यादी प्रश्न निर्माण होऊ शकत नाही.
मानव तर बहुतांशी एकटाच जन्म घेतो व मरतो. महानता एकत्वातच आहे. कुत्रा, मांजर एकाबरोबर चार सहा जन्म घेतात. सर्प जातीत एकाचवेळी लाखो जन्म घेतात, निगोदचे जीव एकावेळी अनंत जन्म घेतात व अनंतचा मृत्यू होतो. अशाप्रकारे खोलवर विचार केला तर जन्म-मरणासाठी सोबत शोधण्याचा अर्थ निगोदला आमंत्रण आहे.
पुष्कळशा लोकांना एकटेपणा खूप सतावतो. सोबत कोणीतरी पाहिजेच परंतु साथ मिळत नाही. संयोग जरूर मिळतो. निगोदामध्ये सुद्धा अनंत जीवांचा संयोग होतो परंतु साथ होत नाही. कारण त्यांच्यात परस्पर सहयोग नाही मात्र एक क्षेत्रावगाहत्व आहे.
संयोग आणि साथ यामध्ये खूप अंतर आहे. संयोगामध्ये सहयोग मिळाल्यावर साथ होतो. दोन व्यक्तींचे एका स्थानावर एकत्रित येणे 'संयोग' होय. त्यांच्यात परस्पर सहयोग होणे 'साथ' आहे.
संयोग क्षणभंगुर आहे, अशरण आहे, असार आहे, परंतु अवश्य आहे. 'साथ' तर नाहीच. एकत्व आत्म्याचा दुबळेपणा अथवा गरज नाही, सहज स्वभाव आहे. एकटेपणा अभिशाप नाही वरदान आहे. जो एकटेपणा मनुष्याला आज चांगला वाटत नाही तो आनंदाचा धाम आहे. ज्यांच्या साथ-सहकारासाठी मनुष्य इतका आकुळ-व्याकूळ राहतो ती केवळ 'मृग-तृष्णा' आहे.