________________
(३६६)
मोठे मोठे राजेही एकटेच निघून गेले. ज्यांची कीर्ती दाही दिशेत पसरली होती आणि जे नीतीपूर्ण व्यवहार करत होते असे राजा भोज, तसेच शत्रूच्या सेनेला थरथर कापविणारे, प्रजेच्या दुःखाला दूर करणारे महाप्रतापी राजा विक्रम आणि अन्यायरूपी शत्रूला काळ असणारे, दिल्लीच्या सिंहासनाला सुशोभित करणारे बादशाह अकबर हे सर्व जेव्हा मृत्यूच्या अधीन झाले तेव्हा दल, बल, खजिना आणि अंतःपुर हे सर्वकाही सोडून एकटेच निघून गेले. परंतु बरोबर कोणलाच नेऊ शकले नाही तर मग दुसऱ्यांची काय कथा ? १५०
अशाप्रकारे ऐतिहासिक उदाहरणांपासून बोध प्राप्त कररून ममतेला दूर करायचे आहे. एकत्व भावनेच्या चिंतनाने मृत्यूच्या वेळी दुःख कमी होते. तसेच स्वतःच्या मृत्यूच्यावेळीसुद्धा दुःख वाटत नाही आणि दुसऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा धैर्य, शांती प्राप्त होते.
सुखात आणि दुःखात समभाव ठेवण्यासाठी ह्या भावनेचे चिंतन अत्यंत श्रेयस्कर आहे. दुःखात तर व्यक्ती धीर धरतो. परंतु सुखात आपल्या आवेगाला अडवू शकत नाही. अनुकूल संयोग प्राप्त होताच आनंदीत होतो. दोन व्यक्ती जर एकमेकाला भेटल्या तर त्यांच्या मनात आनंदाच्या तरंग उठतात परंतु जेव्हा एकटेच मरावे लागते तेव्हा दुःखाला सीमा राहत नाही. गुजराती काव्यात अत्यंत सुंदर सांगितले आहे -
"साथ करे ज्या बे संगाथी, गज-गज फुले मारी छाती, ज्यारे एकलडा मरवु पडे, हूँ त्यारे तने याद करूं छू सुखी थता विसरू तने, ने दुःखी थता याद करूं छू
मुश्लेली ज्यारे पडे, हूं त्यारे तने याद करू छु ।'
जेव्हा दुःख येते तेव्हाच त्याला परमेश्वराचे नाव आठवते अन्यथा मला एकट्याला जायचे आहे, माझ्याबरोबर काय येईल ? काहीच आठवत नाही. परंतु त्याला स्मृती पटलावर सतत चिंतन करीत राहिले पाहिजे की,
एकत्व ही शिव सत्य है, सौन्दर्य है एकत्व में स्वाधीनता सुखशांती का आवास है एकत्व में एकत्व को पहचानना ही भावना का सार है । एकत्व की आराधना, आराधना का सार है ।१११