________________
(२७)
आहे; मूळ आगम ग्रंथ नष्ट झालेले आहेत. ९ब. बौद्ध संस्कृती आणि साहित्य
बौद्ध धर्माचे संस्थापक कपिलवस्तूचे राजकुमार तथागत बुद्ध होते. जे भगवान महावीरांचे समकालीन होते. जन्म, जरा (वृद्धत्व), मृत्यू यांपासून मुक्ती मिळवण्याच्या शोधात त्यांनी संसाराचा त्याग केला. जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाले तेव्हा 'बुद्ध' नावाने प्रसिद्ध झाले.
गौतम बुद्धांनी आपला उपदेश त्या काळातील लोकभाषा- पालीमध्ये दिला. पालीभाषा मागधी प्राकृतचे विकसित रूप आहे. त्यांचा उपदेश तीन पिटकामध्ये संग्रहित आहे. ते (१) विनयपिटक (२) सुत्तपिटक (३) अभिधम्म पिटक नावाने प्रख्यात आहेत.
(१) विनय पिटकामध्ये भिक्षू आणि भिक्षुणींच्या आचरणाचे वर्णन आहे. बौद्ध धर्मात आचाराला 'विनय' म्हणतात. (२) सुत्तपिटकामध्ये बौद्ध धर्माचे सिद्धांत संक्षिप्त रूपात वर्णिलेले आहेत.
(३) अभिधम्मपिटकामध्ये तत्त्वाचे दार्शनिक व गूढ विवेचन आहे. त्याचे तात्त्विकदृष्टीने फार महत्त्व आहे. जे भिक्षू अभिधम्मपिटकाचे शिक्षक होते त्यांचा संघात फार सन्मान होत असे. त्यांचा सत्संग आणि चातुर्मास प्राप्त होणे हे मोठ्या भाग्याचे मानले जात असे.
उपरोक्त तीनही पिटकांवर आचार्यांनी व्याख्येची रचना केली आहे.
बौद्ध धर्माचे हीनयान आणि महायान असे मुख्यतः दोन संप्रदाय आहेत. हीनयान प्राचीन आहे, महायानाच्या रूपात पुढे त्याचा विकास झाला. हीनयान संप्रदायात स्वकल्याणावर अधिक भर दिलेला आहे. ह्याच्यात साधकाच्या तीन भूमिका मानलेल्या आहेत.
(१) स्रोतापन्न (२) सकृत आगामी (३) अनागामी
स्रोतापन्न त्याला म्हणतात, 'जो धर्माच्या प्रवाहात प्रवेश करतो अर्थात धार्मिक श्रद्धा स्वीकरतो. जो स्रोतापन्न होऊ शकत नाही त्याला बौद्ध धर्मात 'पृथक् जन' म्हणतात.
AMER
Sear
जो साधक साधनेद्वारा अशा स्थितीला प्राप्त होतो, त्याला केवळ एकदाच
TERRITER
AToमा