________________
(३६४)
आहे. तो बाजारात गेला. बाजारात शेकडो दुकाने आहेत. त्यात हजारो प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. मनुष्य त्या वस्तू पाहत जातो. परंतु तो सराफाच्या दुकानातच थांबतो. हीरा खरेदी करतो. हीरा सोडूनही तो अनेक वस्तू पाहतो. पण त्याचे ते पाहणे पाहण्यासारखे नसते. ज्याच्याबरोबर अध्यवसाय जोडलेला आहे त्याला पाहिले की सर्वकाही पाहिलेले न पाहिल्यासारखे राहिल. १४४
त्या वस्तूला पाहण्यासाठी जितकी चेतना आवश्यक आहे तितकीच चेतना त्या वस्तूबरोबर जोडायची आहे. त्याबरोबर ममत्वाच्या चेतनेला जोडायचे नाही.
ह्या स्थितीला प्राप्त करण्यासाठी एकत्व आणि समत्व भावनेचे सतत चिंतन आवश्यक आहे. समत्वाच्या सुखसागरासमोर राजा चक्रवर्ती आणि देवेन्द्राचे सुख एक बिंदुतुल्य आहे म्हणून समतेच्या सुखाला धारण करायचे. १४५
समता प्राप्त करण्यासाठी श्री मुनिसुंदरसूरींनी आपल्या संपूर्ण जीवनाचा अनुभव करून उत्तरावस्थेमध्ये 'आध्यात्मकल्पद्रुम' नावाच्या ग्रंथांची रचना केली. यामध्ये स्त्री, आपत्य अर्थात पुत्र-पुत्री, धन, देह इत्यादींचे ममत्वमोचन आणि विषय कषायाचा त्याग इत्यादी अधिकारामध्ये विवेचन केले आहे. अर्थात एकत्व भावनेच्या चिंतनात ह्या सर्व विषयांचा समावेश होऊन जातो.
आचार्य अमितगतीच्या 'द्वात्रिंशिंका' या प्रसिद्ध श्लोकाच्या भावार्थात एकत्व भावनेचा उद्घोष करताना लिहिले आहे - शरीरावरून चामडे उतरल्यानंतर जसे तिथे रोमकूप अर्थात केस राहत नाही त्याचप्रमाणे ज्या आत्म्याची शरीराबरोबर एकता नाही. त्या शरीराने अनुबंधित पुत्र, पत्नी, माता, पिता आणि मित्र इत्यादींची एकता कशी होऊ शकते. १४६
आत्मा नितांत एकटा आणि असंग आहे. कारण त्याने विभाव दशेमुळे जड पदार्थांबरोबर अपनत्व स्थापन केले आहे. परंतु हा त्याचा स्वभाव अथवा मौलिक भाव नाही. स्वभाव शुद्धात्मभाव आहे. 'स्वस्य भावः स्वभावः' अर्थात स्वभाव म्हणजे आत्मा आणि आत्म्याचा भाव होय.
आत्मा परमात्म्यामध्ये केवळ कर्माच्या मलीनतेचा फरक आहे. मळरहित आत्माच परमात्मा आहे. द्वन्द्व दशेमध्ये आत्म्याची दशा परस्पर टक्कर घेते. कषायाविष्ट झालेला म्हणतो, “मी मोठा आहे, मीच आत्मरूप आहे, माझ्यासमोर सगळे नगण्य आहे." प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कषायाचा द्वन्द्व आहे. सर्व आधी-व्याधी,