________________
(२९३)
शरीर दिवसेंदिवस क्षीण होत आहे परंतु
ह्या संसारी लोकांची दशा तर पाहा - आशा (इच्छा, तृष्णा) क्षीण होत नाही. आयुष्य कमी होत आहे पण पापबुद्धी गळत नाही. मोह नित्य स्फुरीत होत आहे परंतु आत्मकल्याणाची प्राण्यांमध्ये थोडी सुद्धा भावना जागृत होत नाही. ज्या परिग्रहाच्या मोहामध्ये मनुष्य सर्वकाही विसरतो त्याच्या नश्वरतेला आणि दुःखरूपतेला व्यक्त करताना सांगितले आहे -
हा परिग्रह अती निर्दयी आहे, करुणारहित आहे, मनुष्याच्या हृदयामध्ये अत्यंत दाह, संताप उत्पन्न करून निघून जातो. मग तो कसा प्रिती करण्यायोग्य आहे ?२७ ज्यांच्या घरात प्रभातकाळी आनंदोत्साहाने सुंदर मंगल गान होत होते, त्याच घरात मध्यान्ह काळी दुःखाचे रूदन ऐकले जाते. सकाळी ज्याचा राज्याभिषेक पाहतो त्याच दिवशी त्या राजाच्या चितेचा धुर पाहिला जातो. २८
अशाप्रकारे आयुष्य ओंजळीत भरलेल्या पाण्याप्रमाणे आहे. शरीर समुद्र किनाऱ्यासारखे आहे. इंद्रियांची अर्थग्रहणशक्ती शत्रूच्या प्रेमासारखी आहे. यौवन तत्काल उगवलेल्या फुलासारखे आहे. असा विचार करणारे संत पुरुष कशानेच मोहित होत नाही. २९
पंडित आशाधर यांनी अनगार धर्मामृताच्या या गाथेमध्ये अनित्यतेचे जे विवेचन केले आहे ते अत्यंत सुंदर मर्मस्पर्शी आहे. आयुष्याची क्षणिकता दाखविण्यासाठी ओंजळीतल्या पाण्याची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे ओंजळीमध्ये भरलेले पाणी काही काळातच झिरपून खाली पडते त्याचप्रमाणे मनुष्याचे आयुष्य पूर्ण होता वेळ लागत नाही. मनुष्य दीर्घकाळापर्यंत जिवंत राहण्याचा मोह बाळगतो. त्याच्या परिणामस्वरूपी तो उन्मत्त होऊन आपल्या इच्छापूर्तीसाठी अर्थसंग्रह करण्यात मग्न राहतो. परंतु एकाएकी त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडतो की त्याची सर्व कामे अपूर्ण राहतात आणि मृत्यू त्याला आपला ग्रास करतो.
शरीराला 'समुद्र किनाऱ्याची' उपमा दिली आहे. समुद्रकिनारा समुद्राच्या वाढत्या लाटांनी छिन्न-भिन्न होत असतो. त्याला तुटण्यास वेळ लागत नाही. हे शरीरही तसेच आहे. इंद्रियांची अर्थग्रहण शक्ती शत्रूच्या प्रेमाप्रमाणे आहे. एखाद्या शत्रूने आपल्या जवळ येऊन प्रेम दाखवले तर त्याची काहीच सार्थकता नाही. ते सर्वथा निरर्थक होईल. त्याचप्रकारे प्रेमाप्रमाणे इंद्रियांची आपापल्या विषयांना ग्रहण करण्याची जी शक्ती आहे ती शत्रूच्या नितांत मिथ्या आहे, खोटी आहे. ती केव्हा नष्ट होईल ते कोणीच सांगू शकत नाही.
यौवनाला तत्काल उमललेल्या फुलाची उपमा दिली आहे. उद्यानात उमललेले