________________
(२८२)
ज्याप्रमाणे अग्नी सोन्याला शुद्ध करतो अर्थात त्याच्या मळाला जाळून नष्ट सोन्याचप्रमाणे ह्या भावना आत्मारूपी सोन्याला स्वच्छ करतात. आत्म्याच्या कर्मरूपी मळाला स्वच्छ करतात, आत्म्याच्या कर्मरूपी मळाला जाळून टाकतात आणि भवसागरामध्ये बुडणाऱ्या जीवाला तारणारी भावना आहे.
श्री मुनी सुंदरसुरी यांनी भावनेच्या महत्त्वाचे आणि उपयोगितेचे अत्यंत हृदयस्पर्शी शब्दात विवेचन केले आहे. ज्याप्रमाणे लहान मुले चपळ आणि चंचल असतात त्याप्रमाणे चित्तसुद्धा अत्यंत चंचल असेत. ते चित्ताला संबोधून सांगतात की, हे चित्त वालका ! ह्या भावना तुला शांतता प्रदान करणाऱ्या अमूल्य औषधीरूप आहे. यांना तू कधीही आपल्यापासून दूर करू नकोस. नेहमी यांना बरोबर ठेव. असे केल्याने विघ्न तुम्हाला छळू शकणार नाही.६
केवळ बत्तीस अक्षरांच्या अनुष्टुप श्लोकामध्ये मुनिवर्यांनी अत्यंत सुंदर अंतःस्फूर्तीप्रद भाव व्यक्त केले आहेत. चंचल व्यक्ती भावनेमध्ये स्थिर होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे चंचलतेमुळे शुभ अथवा शुद्ध भावात टिकून राहू शकत नाही. म्हणून प्रतिक्षण सावधान राहण्याचा उपदेश दिला आहे जसे लबाड लोक चांगल्या लोकांना फसविण्याची संधी शोधत असतात त्याचप्रमाणे दूषित भावना चित्तामध्ये विकृती उत्पन्न करण्यासाठी तत्पर असतात. या दूषित भावना चित्तामध्ये अस्थिरता निर्माण करू नयेत म्हणून भावनेमध्ये विशेषत: शुभ आणि शुद्ध भावनेमध्ये स्थिर राहावे. रोगाने आक्रमण करू नये म्हणून जो आधीपासून पौष्टिक औषधांचे आणि रसायनांचे सेवन करतो तो कधीही व्याधीने व्यथित होत नाही.
ह्या श्लोकाचा एक वेगळा भावार्थ सुद्धा होतो. दूषित ध्यान अर्थात दूश्चिंतनाला ह्या श्लोकामध्ये भूत, प्रेत इत्यादी दुष्ट आत्म्याची उपमा दिली आहे. भूत-प्रेत जेव्हा मनुष्याच्या मागे लागतात तेव्हा ते त्याला दुःख देतात, त्रास देतात, व्यथित करतात परंतु जो मंत्रयुक्त यंत्र अथवा ताईतरूपी औषधी धारण करतो, भूतपिशाच निवारण ताईत बांधून घेतो त्याला प्रेतादींची बाधा होत नाही. ह्या भावना दोष अथवा विकारयुक्त चिंतनरूपी प्रेतांना, पिशाचांना अथवा दानवांना अडविण्यात, चित्तामध्ये वाईट विचार न येऊ देण्यासाठी ताईताप्रमाणे काम करतात.
ह्या कलियुगात शरीरात जरी बळ नसले, उग्र, तप, ध्यान, परिसह इत्यादी जे सत्त्वाने साध्य करावे लागतात ते साधण्याची शक्ती जरी नसली तरी भावनाही मनाने