________________
(१८)
स्वीकारतात आणि समाधिस्थ होतात.
त्यानंतर महासंवर्तक वाऱ्यांचा प्रवाह सुरू होतो. त्या भयंकर वाऱ्यांमुळे वैताढ्य पर्वत, ऋषभकूट, लवणसमुद्राची खाडी, गंगा आणि सिंधू नदी सोडून सगळे पर्वत, किल्ले, महाल, घरे उद्ध्वस्त होतात.
- पाचवा आरा पूर्ण झाल्यावर एकवीस हजार वर्षांचा सुषम-दुःषमा नावाचा (१५.११.१.६५ , सहावा आरा सुरू होतो. त्यावेळी भरतक्षेत्राचे अधिष्ठायक देव पाचव्या आऱ्याच्या नष्ट होणाऱ्या मनुष्यांमधून बीजरूपात काही मनुष्यांना उचलून गंगा सिंधूच्या जवळच्या गंफेत ठेवतात. 1उत्तर आणि दक्षिण विभागामध्ये गंगा-सिंधू नदींच्या समोरासमोरील किनाऱ्यावर ह्या गुफा आहेत, त्या संख्येने एकूण बहात्तर आहेत आणि एकेका गुंफेमध्ये तीन-तीन मजले असतात. त्या गुंफांमध्ये त्या बीजरूप मनुष्यांना सोडून देतात.
पाचव्या आऱ्यापेक्षा सहाव्या आऱ्यामध्ये वर्ण, गंध इत्यादी पुद्गल पर्यायांच्या उत्तमतेमध्ये अनंतपटीने व्हास होत जातो. आहाराची इच्छा अमर्यादित होते. कितीही खाल्ले तरी तृप्ती होत नाही.
सहाच्या आऱ्यामध्ये दिवसा सूर्याच्या उष्णतेने आणि रात्री प्रचंड थंडीमुळे माणसे गुंफेच्या बाहेर पडू शकत नाहीत, परंतु सकाळी व संध्याकाळी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्यावेळी बाहेर पडतात. आणि गंगा सिंधू ननीच्या मच्छ-कच्छ इत्यादी जलचर प्राण्यांना पकडून नदीच्या वाळूत गाडून गुंफेत निघून जातात. ते जलचर जीव सूर्याच्या भयंकर उष्णतेत भाजून निघतात. नंतर दुसऱ्यांदा ती माणसे गुंफेच्या बाहेर येऊन ते मच्छ-कच्छ एक दुसऱ्यांच्या हातातून ओढून घेऊन खाऊन टाकतात. मृतांच्या कवट्यांमध्ये पाणी भरून ते पाणी प्राशन करतात. अशाप्रकारे धर्मशून्य सुखरहित जीवन पूर्ण करून नरक अथवा तिर्यञ्चगतीत जातात. . अशाप्रकारे दहा क्रोडाक्रोडि सागरोपम प्रमाण अवसर्पिणी काळ पूर्ण होतो.
५. उत्सर्पिणी काळ । उत्सर्पिणी काळाचा दुःषम-दुषमा नावाचा पहिला आरा आषाढ कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी सुरू होतो. तो अवसर्पिणी काळाच्या सहाव्या आयसारखाच असतो, इतकाच फरक आहे की ह्या प्रथम आयामध्ये प्रतिक्षण आयुष्य, देहमान
HRESS
imsinalsindia