________________
(२६३)
अथवा मंत्राच्या सहाय्याने मूनींची सेवा करेल या अशा चांगल्या उद्देशाने काही चमत्कार केले तर दर्शन, ज्ञान चरित्राच्या परिणामामध्ये फरक पडत नाही. त्याला दोष मानला
जात नाही १४९
निमित्त इत्यादीच्या सहाय्याने आजीविका चालवणाऱ्याला पापभ्रमण म्हटले आहे. -निमित्तेण य बबहर पापसमणेत्ति वुबइ ॥
अभियोगी भावना ठेवल्याने अर्थात वरील विद्येच्या प्रयोगाने हिंसा होते. असत्यात वृद्धी होते. जगात दंभ, पापाचार आणि अंधविश्वास पसरतो.
जे साधू लक्षणशास्त्र, स्वप्नशास्त्र, भविष्यशास्त्राचे प्रयोग करतात या शास्त्रात आसक्त होतात. अशांना कर्मफळ भोगावे लागते.
आसुरी भावना
उत्तराध्ययन आणि बृहत्कल्पभाष्य या दोन्हींमध्ये चौथी भावना सारखीच आहे. संस्कृत वृत्तीमध्ये नावाचे विश्लेषण करताना लिहिले आहे की, भवनपती श्रेणीचे देव असूर असतात. त्यांची भावना 'आसूरी' म्हटली जाते. अर्थात त्यांचे चिंतन हे क्रोध, मोह इत्यादींनी युक्त असते. कार्यसुद्धा त्याच कोटीचे असते. दोन्ही ठिकाणी ही भावना जवळ जवळ समान अर्थाने घेतली आहे.
आसुरी भावनेचे प्रकार १) अनुबद्ध विग्रह २) संसक्तपणा ३) निमित्तदेशी ४) निष्कृत आणि ५) निरनुकंप. १५१
ह्या पाच भावनेच्या स्वरूपाचे विवेचन याप्रमाणे आहे.
(१) अनुबद्ध विग्रह
ज्याला नेहमी कलह करण्याची सवय आहे, कलह करून जो पश्चाताप करीत नाही, जसे अरे ! मी हे काय केले ? इत्यादी क्षमायाचना करणाऱ्यालाही जो क्षमा करीत नाही, तीव्र कषायाच्या उदयाने जो स्व-पक्ष पर पक्ष दोन्हींमध्येही प्रसन्नतेचा अनुभव करीत नाही. (येथे स्व-पक्ष म्हणजे साधु-साध्वी वर्ग आहे आणि पर-पक्ष म्हणजे ‘गृहस्थ वर्ग' आहे) ह्या दोन्ही पक्षांना पाहून जो संतुष्ट होत नाही. हे सर्व अनुबद्ध विग्रहाच्या अंतर्गत येते. हे जाणून ह्याच्या त्यागाची भावना मनात जागृत केली पाहिजे.१५२ वारंवार कलहकरणाऱ्याला पापश्रमण म्हणतात. कलहामुळे सम्पत्ति शांति आणि सभ्यता नष्ट होते.
२) संसक्तपणा - जो आहार, उपधी, पूजा, आदर सत्कार यामध्येच आसक्त