________________
(२६०)
एक तपस्वी साधू आहेत अस्वीच असतात असे भ्रमपा
साध आहेत ते आपणच का ?" अशावेळी मौन राहणे किंवा साधू तर असतात असे भ्रमपूर्ण उत्तर देणे हा तपस्वी नसताना तपस्वीची प्रतिष्ठा ण्याचा प्रयत्न करणे ही सर्व मायाचार आहेत. म्हणून उत्तराध्ययनाप्रमाणे साधनेमध्ये पण मायावी हे विशेषण रूप आहे.
साधनेमध्ये देव हा शब्द न वापरता मात्र "किल्विष भावना" संबोधित करून वर्णन केले आहे. त्यात अशाप्रकारे वर्णन आहे.
श्रतज्ञानात कपट करणारा अर्थात ज्याला ज्ञान प्रिय नाही पण दिखाऊ विनय करणारा ज्ञानविषयक मायावी आहे. केवलीबद्दल आदर दाखवतो. परंतु मनापासून त्यांच्याबद्दल आदरभाव, पूज्यभाव नाही. यास केवलविषयक मायावी म्हणतात. चारित्र म्हणजे धर्म, त्या चारित्रधर्माची अतिशय भक्ती करत आहे. त्याचे मनःपूर्वक आचरण करीत आहे असे लोकांना भासवतो. पण अंतरंगात जो चारित्राला तृणमात्र मानीत नाही. असा धर्म मायावी.
आचार्य उपाध्याय आणि साधू यांना फसविणारा त्यांच्यात दोष नसेल तरी दोषारोपण करणारा आचार्यादि प्रतीमायावी आणि श्रुतज्ञानात दोष नसताना दोष दाखविणारा, अवर्णवाद करणारा अवर्णवादी आहे, अशा अशुभ विचाराने किल्विषजातीच्या देवात उत्पन्न होतो. हे देव खरे पण इन्द्राच्या सभेत त्यांना प्रवेश नसतो. त्यांना पहारेकऱ्याप्रमाणे बाहेरच थांबावे लागते.१४१
मूलाराधना म्हणजेच भगवती आराधना
अशा प्रकारे जीव माया, निंदा करून स्वतःची दुर्गती करतो. मूलाचारामध्ये किल्विषी भावनेचे वर्णन करताना टीकेमध्ये लिहिले आहे की संसारसमुद्र पार करणारे तीर्थंकर त्याच्या जो प्रतिकूल आहे आणि ऋषी, यती, मुनी-अणगार-श्रावक, श्राविका हा जो चतुर्विध संघ आहे ह्या सर्वांबद्दल विनय न करता जो दुसऱ्यांना ठगण्यात कुशल आहे, त्याला ह्या किल्विष कार्यामुळे पडह वाद्य वाजविणाऱ्या किल्विषक जातीच्या देवात उत्पन्न व्हावे लागते.१४२
स्वर्गामध्ये किल्विषिक देवांची एक जाती आहे. जी देवलोकाच्या खालील भागामध्ये आहे. या पृथ्वीतलावर हरिजनाचे जे स्थान आहे, साफ-सफाई करण्याऱ्यांचे जे स्थान आहे तसेच स्थान देवलोकात या किल्विषिक देवांचे आहे.