________________
(२५२)
कोहाभिभूया न सुहं लहंति, माणंसिणो सोयपरा हवंति ।
मायाविणो हुंति परस्स पेसा, लुद्धा महिच्छा नरयं उविंति१२१ क्रोधाने आक्रान्त जीव सुखी होऊ शकत नाहीत. मानी लोक शोकग्रस्त होतात. लोक दसऱ्याचे चाकर बनतात. आणि अनावश्यक मोठमोठ्या इच्छा करणारे लोभी
मझात जातात.
a
श्री श्रमण भ. महावीरांनी उत्तराध्ययन सूत्रात सांगितले आहे. कोह विजएणं खंति जणयई - क्रोधावर विजय मिळवल्याने क्षमाभाव जागृत
nisha
तो.
माण, विजएणं अद्दवं जणयई - अभिमानावर विजय मिळवल्याने मृदुता जागृत ।
माया विजएणं मज्जवं जणयई - मायावर विजय मिळवल्याने ऋजुता सरलता र प्राप्त होते.
लोभ विजएणं मद्दवं जणयई - लोभावर विजय मिळवल्याने संतोष प्राप्त X
वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळ्या शब्दांनी कषाय भावनेचे वर्णन केले आहे. परंतु सर्वाचा भावार्थ सारखाच आहे.
जिथे कषायाचा वास आहे तेथे संसार आहे. जिथे कषाय नाही तेथे मुक्ती निश्चित आहे. ज्याप्रमाणे रात्री दिव्याचा प्रकाश आवश्यक आहे. वादळाशिवाय पाऊस नाही, विजाशिवाय झाड नाही. मातापित्यांशिवाय संतान होत नाही, सूर्याशिवाय दिवस नाही, मरणशिवाय जन्म नाही, त्याचप्रमाणे कषाय सोडल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून कषायाचा त्याग करण्याचे सतत चिंतन मनन करावे आपले हृदय पवित्र भावनेने भरावे. तरच आत्मिक आनंदाची प्राप्ती होईल.
कंदादी संक्लिष्ट भावना मनुष्याचे जीवन शुभ व अशुभ तत्त्वांनी बनलेले आहे. असे म्हणतात की, माणसामध्ये प्रकाशाचा अंश थोडा आणि अंधकाराचा अंश अधिक असतो. मनुष्य म्हणजे राज व तम यांचा पुतळा आहे. म्हणून मनुष्याने पुरुषार्थ करून अंधकार दूर करायला पाहिजे. मनुष्य जन्म याचसाठी मिळाला आहे की अशुभाकडून शुभाकडे जाण्यासाठी मलीन