________________
(२५०)
नेहमी रहावे. कषाय दूर
अशाप्रकारे चारही कापाय त्याज्य आहत. कपायापासून चेतन नाही ते तर अजीब आहेत. कर्माची एक अवस्था आहे. कषाय वाईट नाहीत तर चेतनात प्रवेश करून आपणच आपल्या आत्म्याला विकृत करतो. कपायाची आपला सर्वनाश करते. आसक्ती वाईट आहे. घातक आहे. आत्म्याचे परिणाम विकृत झाले की कषाय आपल्यावर हावी होतात मग सर्वनाश ठरलेलाच आहे. या कषायाच्या आधीन झाल्यामुळे सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. आणि जोपर्यंत सम्यक्त्व प्राप्त होत नाही तोपर्यंत संसार परिभ्रमण चालूच राहणार.
दुसरी अप्रत्याख्यानी कषाय चौकडीचे आवरण दूर झाले तरच मुमुक्षू आत्मा संसार परित्त (सीमित) करू शकतो. ह्याला सम्यक् दर्शन प्राप्त होऊ शकते. परंतु तो व्रत नियम पाळू शकत नाही.
1
तिसरा प्रकार प्रत्याख्यानावरण कषाय. यात साधक सर्वविरती अथवा देशविरती व्रत घेऊ शकतो.
चौथा प्रकार संज्वलन कषाय ह्या स्थितीमध्ये जीवाला उच्चतम चारित्र प्राप्त होऊ शकते. तरीपण जोपर्यंत सर्व कषाय नष्ट झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही.
म्हणून मोक्षार्थी जीवाने कषाय निर्मूलन करण्याचाच प्रयत्न करावा. अक्रोधी, अमानी, अमायी, अलोभी होण्याचा सतत अभ्यास करावा. जोपर्यंत कषाय सुटत नाही तोपर्यंत जीव पर भाव म्हणजे विभावदशेत आपले जीवन व्यर्थ घालवतो. विभावाकडून स्वभावाकडे येण्यासाठी आत्म्यावरील कर्माचे आवरण दूर करण्यासाठी अकषायी भावात रमण करणे अत्यावश्यक आहे.
-
मानवाला स्वातंत्र्याच्या सुखाचा अनुभव तेव्हा होतो जेव्हा सर्व कषाय शांत होतात. भ. महावीरांनी स्वानुभावाने सांगितले की, कषायाने ग्रस्त व्यक्ती मुक्तपणे जगू शकत नाही. आम्ही बाह्य स्वतंत्रता मिळवली पण कषायापासून मुक्त होण्याचा तिळमात्रही प्रयास केला नाही. त्यामुळे आज संपूर्ण जन जीवन हिंसा, घृणा, लोभ, अहंकाराने ग्रासलेले आहे. सगळीकडे हिंसेचे तांडव नृत्य चालले आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बाह्य स्वातंत्र्य मिळणे सोपे आहे पण खरे आत्मिक स्वातंत्र्यासाठी आपल्या भावनेवर आपले शासन पाहिजे, महापुरुष जे होऊन गेले ते आंतरिक स्वातंत्र्याने संपन्न होते. 'स्व' वर 'स्व'चे अनुशासन होते.
क्रोधामुळे प्रेम व बंधुत्व नष्ट होते. मान केल्याने बिनम्रता नष्ट होते. जिथे माया,