________________
(२४८)
काहीच देत नाही. अशाने त्याची अपकीर्ती होते. असा कंजुष माणूस जिवंत
असून मृतसमान आहे. ११३
लोभ व्यसन मंदिरम् लोभ मुलानि पापानि,
लोभाद्धर्मो विनश्यति, सर्वगुण विनाशनम् लोभात् ।। अर्थात् - लोभ अनिष्ट प्रवृत्तीचे मूळ आहे, पापाचे मूळ आहे. धार्मिक प्रवृत्तीचा माश लोभामुळेच होतो. लोभाने सर्व सद्गुणांचा नाश होतो.
सर्वप्राणीमात्रात लोभ असल्यामुळे त्यास सर्वव्यापक म्हणतात. त्रैलोक्यात जितकी पापकर्म होतात ती लोभामुळेच उत्पन्न होतात. लोभभावना सर्वप्रकारच्या विपत्तीचे मूळ कारण आहे.
लोभरूपी अग्नी कधी शीतल होत नाही. तो आत्म्याला सतत जाळतच असतो. लोभामुळे दान देण्याची भावना होत नाही. दान न दिल्याने जन्मोजन्मी दरिद्रता पदरात पडते. लोभी माणसाला हे अज्ञान असल्यामुळे आपत्तीचे खरे कारण ते समजू शकत नाही.
मोहांघ माणूस त्यागकडे वळतच नाही. मोहाचे उत्पत्तीस्थान तृष्णा व तृष्णेचे उत्पत्ती स्थान मोह आहे. ज्याप्रमाणे कोंबडीपासून अंडे व अंड्यापासून कोंबडी उत्पन्न होते, त्याचप्रमाणे तृष्णा व मोह यांचा घनिष्ट संबंध आहे.११४
तृष्णा, मोहाचे स्थूल रूप आहे. दुःखाचे मूळ कारण तृष्णा आहे.
लोभाचे वर्णन करताना कुन्थुसागर मुनी लिहितात, कदाचित तेलाने दिवा तृप्त होईल. लाकडाच्या समूहाने अग्नीपण तृप्त होईल, हजारो, लाखो नद्यांनी समुद्र तृप्त होऊ शकेल. पापाने पापी तृप्त होऊ शकेल, एखाद्या वेळेस धनाने कृपण पण तृप्त होऊ शकेल. म्हणजे असाध्य ते साध्य होऊ शकेल. पूर्व दिशा, पश्चिम होऊ शकेल. अग्नी शीतल होऊ शकेल. चंद्र उष्ण होऊ शकेल. मेरुपर्वत चलायमान होऊ शकेल, मुनी क्रोधी बनू शकेल, चंचल अशी लक्ष्मी स्थिर होईल, दिवस रात्र होईल. परंतु लोभ करणारा पापी माणूस साम्राज्याचा अधिपती झालातरी कधीच तृप्त होणार नाही.
ज्याप्रमाणे वाऱ्यामुळे अग्नी अधिक प्रज्वलित होतो सर्वनाश करतो, त्याप्रमाणे लाभरूपी अग्नी आपल्या आत्मिक धनाला, आत्मशुद्धीरूप स्वराज्याला, जाळून भस्म करून टाकतो. संसाराच्या दु:खापासून वाचविणारी आत्मविद्या, आत्मिकसुख देणारे इच्छानिरोधरूपतप जाळून टाकते. क्षमा, शांती समता, धैर्य, सहनशीलता, विवेकबुद्धी,