________________
गौतमस्वामींच्या जिज्ञासेचे समाधान करताना श्रमण भगवान महावीरांनी जे काळाचे वर्णन केले आहे ते पठनीय आहे.३
भरतक्षेत्रात काळ दोन प्रकारचा आहे (१) अवसर्पिणी काळ (२) उत्सर्पिणी काळ
'अवसर्पण' काळ शब्दाचा अर्थ उत्तरोत्तर न्यून होणे, कमी होणे असा आहे. 'उत्सर्पण' या शब्दाचा अर्थ उत्तरोत्तर वाढणे अथवा उन्नत होणे असा आहे.
अवसर्पिणी काळाचे सहा प्रकार आहेत : (१) सुषम-सुषमा, (२) सुषमा, (३) सुषम-दुःषमा (४) दुःषम-सुषमा (५) दुःषमा (६) दुधम-दुःषमा
उत्सर्पिणी काळही सहा प्रकारचा आहे : (१) दुःषम-दुःषमा (२) दुषमा (३) दुःषम-सुषमा (४) सुषम-दुःषमा (५) सुषमा (६) सुपम-सुषमा
अवसर्पिणी काळात वर्ण, गंध, रस, स्पर्श, संहनन, संस्थान, आयुष्य, शरीर, सुख इत्यादी पर्यायांची क्रमशः अवनती होते. उत्सर्पिणीमध्ये स्परोक्त पर्यायांची क्रमशः उन्नती होते. अवसर्पिणीची चरम सीमा म्हणजे उत्सर्पिणी काठाचा आरंभ आहे आणि उत्सर्पिणीची अंत म्हणजे अवसर्पिणीचा जन्म आहे.
200000
कालचक्र बैलगाडीच्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे खालन वर आणि वरून खाली फिरत राहते. दोन्ही काळात तीर्थंकरांचा जन्म होतो. ज्यांची संख्या प्रत्येक विभागात चोवीस-चोवीस असते.
आजकाल अवसर्पिणी काळाचा दु:षम नावाचा पानवा आरा चालला आहे. ह्या युगाचा जीवनक्रम सुषम-सुषमाने सुरू होतो.
४. अवसर्पिणी काळ सुषम-सुषमा नावाच्या प्रथम आऱ्यामध्ये मानवी जीन अत्यंत सुखमय होते. त्याच्यावर निसर्गाचा अपार अनुग्रह होता. मानवाच्या इच्छा अल्प होत्या. त्या इच्छा कल्पवृक्षाच्या माध्यमाने पूर्ण होत होत्या. मानव पूर्ण निरोगी आणि प्रसन्न राहात होता. पृथ्वी सर्व रसांनी परिपूर्ण होती. मानवाला तीन दिवसानंतर एकदा आहार घेण्याची इच्छा होत होती. आणि तो आहार त्यांना कल्पवृक्षानेच प्राप्त होत होता, मानव वृक्षाखालीच राहत होते. ते विपुल सावली देणारे वृक्ष त्यांना भव्य भवनांप्रमाणेच वाटत होते. त्या युगात मनुष्याचे आयुष्य तीन पल्योपमाचे होते. ...............