________________
(२३६)
- एका अवगुणाने नाश पावते मन नाही. आत्मोन्नतीसा
गणाने नाश पावते. अभिमान बाळगून माणूस कधीही आत्मोन्नती करू आत्मोन्नतीसाठी मनाच्या सर्व विकारी भावना नष्ट करणे आवश्यक आहे.
नष्ट होत नाही तोपर्यंत विनय येणारच नाही. आणि एक विनयगुण नसेल अन्य कोणतेही सदगुण जवळपास फटकणारसुद्धा नाही.
र गौतमस्वामींनी श्री भगवान महावीर स्वामींना प्रश्न केला होता की "हे जवान ! मानावर विजय मिळवला तर जीवाला काय लाभ होतो ?"
भ महावीरांनी ह्या प्रश्नाचे समाधान करताना सांगितले, ''मान-विजय ठविल्याने मृदुता गुण प्राप्त होतो. नवीन कर्माचे बंधन होत नाही. आणि पूर्वोपार्जित कर्माची निर्जरा होते."
मानाचे निवासस्थान आपल्या मानेत आहे. तो मनुष्याला अक्कड बनवतो. 'ही व्यक्ती अभिमानी आहे' हे त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून कळते.
अभिमानाने अपकीर्ती होते. मृत्यूची पीडा क्षणिक असते पण मान भंग झाल्याने होणारी पीडा सतत त्रास देत राहते.८७
आत्म्याच्या प्रत्येक प्रदेशातून अभिमान झळकतो. अभिमानाला अष्टफणा नागाची उपमा दिली जाते.
ठाणांग सूत्रात मद आठ प्रकारचे सांगितले आहेत.
१) जातिमद २) कुलमद ३) बलमद ४) रुपमद ५) तपमद ६) सूत्रमद ७) लाभमद ८) ऐश्वर्यमद.
_जातीच्या मदामुळे संपूर्ण विश्वात विनाश ओढवला आहे. ह्याच्यामुळे भयानक हिंसा होते. जातीभेदामुळेच असंख्य हिंदू-मुसलमान एक दुसऱ्याचे वैरी बनले आहेत.
__ तप इत्यादी गुणांची विशेषता साक्षात दिसते पण जाती आणि कुळाची विशेषता बाह्य रूपाने दिसत नाही.
ऐश्वर्याचा मद तर कोणालाच सुटत नाही. ऐश्वर्य काही टिकणारे असतेच असे नाही. पण त्या मदात त्याला विसर पडतो व इतरांना तो तुच्छ लेखतो. आजचे करोडपती उद्या भिकारपती होतात हे आपण 'ह्याचि डोळा त्याचि देही' पाहतो. पण ऐश्वर्याचा मद अभिमान माणसाला आंधळा करतो.
अनेक विद्वानांना आपल्या ज्ञानाचा गर्व असतो. पण 'केवळज्ञाना' समोर आपले