________________
(२२५)
वस्तबद्दलची परिग्रह भावना सोडणे लोकांना सोपे वाटते पण फक्त वस्तूची बाब असते असे नाही तर मनुष्याच्या जीवनात परिग्रह वाढविणाऱ्या तीन एषणाका आहेत. १) वित्तेषणा २) पुत्रैषणा ३) लोकेषणा.
कदाचित वित्तेपणा म्हणजे धन इत्यादीवरील मूर्छा सुटू शकते. पुत्रैषणा-पुत्र, पत्नी, परिवारावरील ममत्व पण सुटू शकते.
पण लोकेषणा प्रसिद्धी, प्रशंसा, कीर्ती, मान-सन्मान यावरील आसक्ती सुटणे अत्यंत कठीण आहे. मोठे-मोठे साधक याच्या बळी पडतात.
सर्वात कठीण आणि महान परिग्रह आहे, राग-द्वेष. कषायभाव विषयवासनेने ग्रासलेले विचार आणि मनाची अतृप्त तृष्णा, लालसा, आकांक्षा, कामना या अशुद्ध भावनेने युक्त व्यक्ती परिग्रही आहे मग त्याच्याजवळ बाह्य पदार्थ असो वा नसो कमी असो किंवा जास्त असो किंवा अजिबात नसो. ममत्वभाव आहे म्हणजेच परिग्रह.
संसारात माणसावर जी संकटे येतात त्याचे कारण परिग्रह आहे. परिग्रह असले तरी दुःख, नसेल तरी दुःख.
परिग्रह उपार्जन करणे दुःख आहे. परिग्रह येणे दुःखकारक व जाणे हे ही दुःखकारक, म्हणून दुःखदायी अशा परिग्रहाचा धिक्कार केला पाहिजे.६६
परिग्रही निर्दयी असतो. ज्याच्या हृदयात दया, करुणा आहे तो परिग्रहासाठी दुसऱ्याला कधीच त्रास देणार नाही. तो स्वतः जवळही परिग्रह संग्रह करणार नाही. परिग्रहामुळे द्रोह, बैर निर्माण होतात. जिथे वैर-शत्रुत्व तेथे प्रेम नसरणारच.
आपल्याला असे वाटते की प्राप्त वस्तूंचा संग्रह करणे व त्यावर ममत्व असणे म्हणजे परिग्रह. पण ज्या वस्तू आपल्याजवळ नाहीत व मिळण्याची शक्यता ही नाही अशा वस्तू प्राप्त व्हाव्यात अशी तीव्र इच्छा, उत्सुकता असणे हा ही परिग्रहच आहे.
श्रमण भगवान महावीरांच्या दहा श्रावकांपैकी प्रथम श्रावक आनंद त्यांच्याजवळ जेवढी संपत्ती होती ती ठेवून त्यापेक्षा अधिक न मिळविण्याचा त्यांनी निश्चय केला. अप्राप्त वस्तूंचा त्याग केला. आपल्याला प्रश्न पडतो की अप्राप्त वस्तूंचा त्याग केला तर त्यात काय विशेष केले. ज्या वस्तू मिळाल्याच नाहीत तर ज्यांच्यासमोर त्याग करण्याची प्रतिज्ञा घेतली. ती पण कोणी साधारण व्यक्ती नव्हती. साक्षात् प्रभुमहावीरांच्या समक्ष त्याग केला होता. यात शंका करण्याचे कारणच नाही. शास्त्रातही उल्लेख आहे की "इच्छापरिमाणं